मुंबई, 23 मे : दागिने म्हटलं की ते आपण सामान्यपणे लॉकरमध्ये ठेवतो. मग ते सोन्याचे असो, चांदीचे असो वा हिऱ्याचे. महाग असल्याने आणि चोरीला जाण्याची भीती असल्याने ते आपण कपाटातील किंवा बँकेतील लॉकरमध्ये ठेवतो. पण तुम्ही कधी लॉकरऐवजी बाथरूम-टॉयलेटमध्ये दागिने ठेवून पाहिले आहेत का? तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटलं असेल पण असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये दागिने ठेवण्याचा मोठा फायदा आहे. तो काय हे एका गृहिणीने एका व्हिडीओतून सांगितलं आहे. तिने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अनेक गृहिणी काही ना काही घरगुती जुगाड करत असतात. दागिन्यांचा हा जुगाडही अशाच जुगाडांपैकी एक आहे. अशा जुगाडाचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
गृहिणीने व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तिने वेगवेगळे ज्वेलरी बॉक्स घेतले आहेत. त्यात वेगवेगळे दागिने आहेत. ते सर्व दागिने तिने एकाच ज्वेलरी बॉक्समध्ये केले आहेत. अशाच पद्धतीने एकाच ज्वेलरी बॉक्समध्ये सर्व दागिने ठेवण्याचा सल्ला तिने दिला आहे. त्यानंतर हा बॉक्स एका कापडात गुंडाळा, असं तिनं सांगितलं आहे. उन्हाळ्यात AC वापरताय मग त्याच्या रिमोटवर चपातीचं पीठ नक्की लावा; का ते VIDEO मध्येच पाहा नंतर ही गृहिणी हा कापडात गुंडाळलेला ज्वेलरी बॉक्स टॉयलेटमध्ये घेऊन जाते. तिथं एक डस्टबिन आहे. जो स्वच्छ आणि पूर्ण रिकामा आहे. म्हणजे याआधी कचऱ्यासाठी हा डस्टबिन वापरलेला नाही. या डस्टबिनमध्ये ती हा बॉक्स ठेवते. त्यानंतर ती त्यावर साबणाचे रिकामे बॉक्स आणि रिकाम्या बाटल्या टाकते. जेणेकरून दागिन्यांचा बॉक्स पूर्णपणे झाकला जाईल. गृहिणीने सांगितल्यानुसार जेव्हा तुम्ही कधी घराबाहेर जाणार असाल आणि घरात महागडे दागिने असतील जे चोरीला जाण्याची भीती वगैरे असेल तेव्हा तुम्ही हा जुगाड करू शकता. चोर टॉयलेटमध्ये जाऊन डस्टबिन उघडून तर बिलकुल पाहणार नाहीत. डस्टबिनमध्ये असं काही असेल याचा कुणी विचारही करणार नाही. जरी काही टाकण्यासाठी डस्टबिन उघडलं तरी त्यात वर टाकलेला कचराच दिसेल. ज्यात कुणी हात टाकणार नाही. VIDEO - फक्त एका रबरने एकाच वेळी कापा भरपूर भाज्या; झटपट भाजी चिरण्याची सर्वात सोपी ट्रिक इंडियन व्लॉगर पिंकी युट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
तुम्हाला हा जुगाड कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा. हेही वाचा - बारावीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट्स फक्त एका क्लिकवर