मुंबई, 24 मे : कपडे धुणं म्हणजे वैतागाचं काम. तसं आता कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आहेच. पण तरी काही कपडे थोडेफार चोळून वॉशिंग मशीनमध्ये टाकावे लागतात. बऱ्याचदा असं होतं की, वॉशिंग मशीनमध्ये हवे तसे कपडे स्वच्छ होत नाहीत, डाग राहतात किंवा कपड्यांची वाटही लागते. अशा वेळी लोक कपडे धुण्यासाठी घरी मोलकरीण ठेवतात. किंवा स्वतःच थोडे हातांनी चोळून ते वॉशिंगमध्ये टाकतात. पण आता तुम्हाला आम्ही कपडे धुण्याची अशी ट्रिक दाखवणार आहोत की तुमची कपडे धुण्याची झंझट संपलीच समजा. कपडे धुण्याच्या सर्वात सोप्या ट्रिकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही गृहिणी घरात काही ना काही जुगाड करतात, अशाच घरगुती जुगाडापैकी एक हा कपडे धुण्याचा जुगाड. एका गृहिणीने आपल्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने कोणत्याही मेहनतीशिवाय कपडे धुण्याची पद्धत दाखवली आहे.
सामान्यपणे कपडे धुण्यासाठी आपण साबण, डिटर्जंट, ब्लीचचा वापर करतो. पण महिलेने दाखवल्यानुसार तिने दाखवलेल्या ट्रिकनुसार साबण, डिटर्जंट वापरण्याची गरजच नाही. घासण्याची आणि धुण्याचीही गरज नाही. कपडे धुणं आता मेहनतीचं काम नाही. Kitchen Jugaad : Gold Jewellery लॉकरऐवजी टॉयलेटमध्ये ठेवा; काय कमाल होते ते VIDEO मध्येच पाहा महिलेने व्हिडीओत दाखवल्यानुसार औषधांच्या एक्स्पायर गोळ्या घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्यात या गोळ्या टाका. शक्यतो गोळ्या पांढऱ्याच घ्या. कलरफुल गोळ्या घेऊ नका. गोळ्या पाण्यात पूर्ण विरघळल्यानंतर कपडे त्यात भिजत घाला. पाण्यात 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवा. तुम्ही व्हिडीओ पाहिलात तर अंडरगार्मेंट्सचा कलर पांढराशुभ्र झालेला दिसेल. आता यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही साबणाने हे कपडे पुन्हा धुवा नाहीतर असेच आणखी एकदा स्वच्छ पाण्यात पिळून घ्या. साबण लावण्याची गरज नाही. अशा पद्धतीने कपडे धुवायला फार मेहनतही लागत नाही, हे तुम्ही यात पाहिलंच असेल. याशिवाय साबण आणि डिटर्जंटही लागलं नाही. VIDEO - फक्त एका रबरने एकाच वेळी कापा भरपूर भाज्या; झटपट भाजी चिरण्याची सर्वात सोपी ट्रिक युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
या जुगाडाच्या परिणामाची न्यूज 18 लोकमत हमी देत नाही. तुम्ही एकदा करून पाहा आणि त्याचा काय, कसा परिणाम आला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.