नवी दिल्ली, 01 जून : आतापर्यंत टिकली तुम्ही कपाळाला लावली असेल. पण याशिवाय टिकलीचे आणखीही काही उपयोग आहे. असाच एक उपयोग एका गृगिणीने दाखवला आहे. या टिकलीचा टॉयलेटमध्येही मोठा फायदा आहे. तुमच्या घरातील टॉयलेटला टिकली नक्की लावा. याचा फायदा का आहे, ते या गृहिणीने व्हिडीओत दाखवलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. गृहिणींकडे काही ना काही घरगुती जुगाड असतात. अशाच जुगाडापैकी हा एक जुगाड. ज्यात टॉयलेटला टिकली लावून दाखवण्यात आली आहे. आता टॉयलेटमध्ये टिकलीचा नक्की काय वापर आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग व्हिडीओ पाहूया.
व्हिडीओत पाहू शकता, इंडियन टॉयलेट दिसतं आहे. या टॉयलेटवर जिथं आपण पाय ठेवतो, तिथं तुम्हाला ही टिकली लावायची आहे. व्हिडीओत दाखवल्यानुसार गृहिणीने पाय ठेवतो त्या भागावर थोडं पुढे दोन्ही कोपऱ्यात अशा चार टिकल्या लावल्या, आता याचा काय फायदा. शक्यतो तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुमच्यासाठी हा जुगाड फायद्याचा ठरेल. Kitchen Jugaad - कढईऐवजी तव्यावर एकाच वेळी बनवा भरपूर पुऱ्या; आठवडाभर गरमागरम खाल, पाहा Recipe Video इंडियन टॉयलेटमध्ये बसणं लहान मुलांना सुरुवातीला बसणं कठीण होतं. मुलांना पाय नीट ठेवता येत नाही, बसायला ते पाय घसरेल आपण आत पडू म्हणून घाबरतात. त्यामुळे मुलांना शिकवणं कठीण होतं, टॉयलेटमध्ये सतत त्यांच्यासोबत राहावं लागतं. पण अशा अशा वेळी अशा पद्धतीने तुम्ही टिकलीचा वापर करू शकतो. टॉयलेटवर जिथं आपण पाय ठेवतो तिथं व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे टिकली लावून ठेवा आणि जिथं टिकलीची खूण केली आहे, तिथंच पाय ठेवा असं मुलांना सांगा. मुलं बरोबर तिथंच पाय ठेवतील. प्रत्येक वेळी तुम्ही त्यांच्यासोबत असण्याची किंवा त्यांना सांगण्याची गरज नाहीय टिकलीला गोंद असतो, त्यामुळे ती टॉयलेटला नीट चिकटून राहिल. टिकली निघणार नाही. यामुळे मुलांना हळूहळू टॉयलेटमध्ये बसण्याची सवय होईल. Kitchen Jugaad - फ्रिजमध्ये तेलाची कमाल; नक्की लावा, काय परिणाम होतो पाहा VIDEO इंडियन व्लॉगर पिंकी या यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
तुम्ही तुमच्या मुलांना टॉयलेटमध्ये बसण्यासाठी कसं ट्रेनिंग दिलं किंवा कसं ट्रेनिंग देत आहेत. तुम्ही असा काही जुगाड केला होता का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. Maharashtra SSC Result 2023 Live updates: थोड्याच वेळात निकाल, न्यूज18 लोकमतवर सर्वात आधी पाहा