जाहिरात
मराठी बातम्या / Viral / धक्कादायक! दारूड्याला चावताच सर्वात विषारी King Cobra चाही मृत्यू; पाहा Shocking video

धक्कादायक! दारूड्याला चावताच सर्वात विषारी King Cobra चाही मृत्यू; पाहा Shocking video

माणसाला चावल्यानंतर कोब्राचाच मृत्यू (फोटो सौजन्य - Canva)

माणसाला चावल्यानंतर कोब्राचाच मृत्यू (फोटो सौजन्य - Canva)

किंग कोब्रा साप चावल्यानंतर मृत सापाला घेऊन ही व्यक्ती रुग्णालयात उपचारासाठी आली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लखनऊ, 13 ऑक्टोबर : किंग कोब्रा म्हणजे जगातील सर्वात खतरनाक सापांपैकी एक आहे. या सापाचं विष इतकं घातक असतं ही त्याने दंश केल्यानंतर काही मिनिटांतच संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. असं असताना एका व्यक्तीने मात्र कोब्रा साप आपल्याला चावल्यानंतर त्याचाच मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. रुग्णालयात आपत्कालीन विभागात एक व्यक्ती घाईघाईत आली. डॉक्टरांना आपल्याला किंग कोब्रा साप चावला इंजेक्शन द्या असं सांगू लागली. या व्यक्तीने एका पिशवीत सापालाही आणलं होतं. हा तोच साप जो आपल्याला चावला, असं या व्यक्तीने सांगितलं. साप मृत झाला होता. हे वाचा -  Shocking Video! छोट्या छोट्या मुंग्यांनी केली खतरनाक सापाची शिकार; अक्षरश: लावली वाट व्हिडीओत तुम्ही पाहू शकता बेडवर बसलेली एक व्यक्ती डॉक्टरांशी बोलते आहे. कदाचित साप आपल्याला कसा चावला याची माहिती देत असावी. व्यक्तीला पाहिल्यानंतर ती नशेत असल्याचं दिसतं. साप पायाला कुठे चावला तेसुद्धा ती दाखवते.

News18लोकमत
News18लोकमत

आपण रस्त्याने जात असताना आपल्याला साप चावला. सापाने आपल्याला दोनदा दंश केला. त्यानंतर आणि  साप आपल्याला चावल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असा दावा केला आहे, असं या व्हिडीओच्या बँकग्राऊडला देण्यात आलेल्या माहितीतून ऐकायला मिळतं. हे वाचा -  साधा साप समजून मुलाने खतरनाक King Cobra चीच शेपटी धरली; पुढच्याच क्षणी… Shocking Video इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार ही घटना उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमधील आहे. पण हा व्हिडीओ आणि त्यातील माहिती किती खरी असावी, याची शाश्वती न्यूज 18 लोकमत देत नाही.

जाहिरात

हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. कुणी शॉकिंग तर कुणी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं. ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात