जाहिरात
मराठी बातम्या / Viral / साधा साप समजून मुलाने खतरनाक King Cobra चीच शेपटी धरली; पुढच्याच क्षणी... Shocking Video

साधा साप समजून मुलाने खतरनाक King Cobra चीच शेपटी धरली; पुढच्याच क्षणी... Shocking Video

मुलाने धरली किंग कोब्राची शेपटी.

मुलाने धरली किंग कोब्राची शेपटी.

रस्त्यावर सापाला पाहताच मुलाने त्याची शेपटी धरून त्याला खेचलं. त्यानंतर जे घडलं ते धडकी भरवणारं आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 05 ऑक्टोबर : साप म्हटलं तरी अनेकांना दरदरून घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत, जे सापांसोबत बिनधास्त खेळताना दिसतात. सोशल मीडियावर असे बरेच सापाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका मुलाला चक्क रस्त्यावर साप दिसला. याला साधा साप समजून एका मुलाने त्याची शेपटी धरली. पण हा साधासुधा साप नव्हे तर चक्क खतरनाक किंग कोब्रा होता. जगातील सर्वाधिक खतरनाक आणि विषारी सापांपैकी एक असलेला किंग कोब्रा. हा साप चक्क रस्त्यावर दिसला. त्याला पाहताच मुलगा उत्साही झाला. उत्साहात त्याने सापाची शेपटी धरली आणि त्याला खेचलं. त्यानंतर पुढच्या क्षणी जे घडलं ते काळजाचं पाणी पाणी करणारं आहे. तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. हे वाचा -  रात्रीच्या अंधारात रस्त्यावर अजगर दिसताच व्यक्तीनं केली अशी गोष्ट, Video पाहून उडेल थरकाप व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर साप सरपटताना दिसतो आहे. त्याच्या जवळच एक मुलगा आहे. आता असा रस्त्यावर अचानक साप दिसल्यानंतर कुणालाही भीती वाटेल. पण हा मुलगा बिलकुल घाबरत नाही. तर तो त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करतो. सापाची शेपटी धरून तो खेचतो.

News18लोकमत
News18लोकमत

तेव्हा साप त्याच्यासमोर फणा काढून राहतो आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. हे पाहूनच आपल्याला धडकी भरते. पण मुलाला मात्र बिलकुल भीती वाटत नाही. तो पुन्हा पुन्हा सापाची शेपटी खेचत राहतो आणि तितक्या वेळा सापही हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.

जाहिरात

थोड्या वेळाने मुलगा त्या सापाचं डोकं आपल्या हातात धरतो. तो सापाला अशा पद्धतीने आपल्या हातात पकडतो की तो हल्ला करणार नाही किंवा दंश करणार नाही. हे वाचा -  VIDEO - विद्यार्थिनीच्या बॅगेतून येत होता विचित्र आवाज; उघडताच शिक्षकांनाही फुटला घाम @animalsinthenaturetoday इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहूनच नेटिझन्स भयभीत झाले आहेत. पण काहींनी मुलाच्या हिमतीचं आणि कौशल्याचं कौतुकही केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात