मुंबई, 12 ऑक्टोबर : सापाच्या शिकारीचे तुम्ही बरेच व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. ज्यात सापाला इतर प्राण्यांची शिकार करताना तुम्ही पाहिलं असेल. सामान्यपणे साप आणि उंदीर, साप आणि मुंगूस यांच्या फायटिंगचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण कधी साप आणि मुंग्यांचा व्हिडीओ पाहिला आहे का? बरं साप आणि मुंग्या आमनेसामने असतील तर यात कोण ताकदवान, कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं. साहजिकच याचं उत्तर साप असेल. कारण मुंग्यांना काय आपण असंच एका बोटाने चिरडून मारून टाकतो, त्यांच्या सापासमोर काय टिकाव लागणार? पण साप ज्याला माणसांसह भलेभले प्राणीही घाबरतात अशाच खतरनाक सापाची छोट्याशा मुंग्यांनीच शिकार केली आहे. साप आणि मुंग्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. शिकार करायला गेलेल्या सापाची छोट्या छोट्या मुंग्यांनी अक्षरशः वाट लावली आहे. तुमच्या आमच्याप्रमाणेच सापानेही छोट्या मुंग्यांना कमजोर समजून शिकारीसाठी त्यांच्या बिळ्यात घुसण्याची हिंमत केली. पण हीच डेअरिंग त्याला महागात पडली. आपल्या घरात घुसखोरी करणाऱ्या सापाला मुंग्यांनी भयानक शिक्षा दिली. हे वाचा - साधा साप समजून मुलाने खतरनाक King Cobra चीच शेपटी धरली; पुढच्याच क्षणी… Shocking Video भुकेला साप शिकारीच्या शोधात होता. त्याचवेळी त्याची नजर एका बिळावर पडते. या बिळात उंदीर वगैरे असावा असं त्याला वाटतं. म्हणून तो त्या बिळात घुसतो. पण ते बिळ खरंतर उंदराचं नव्हे तर मुंग्यांचं होतं. बिळात मुंग्या भरलेल्या होता. जसा साप या बिळात शिरला तशा त्यातील मुंग्या बाहेर आल्या. या मुंग्यांनी सापावर एकत्र अटॅक केला. कित्येक मुंग्यांनी मिळून त्याची अक्षरशः वाट लावली.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सापावर बऱ्याच मुंग्या आहेत. साप त्या मुंग्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडतो आहे. पण मुंग्यांनी त्याला असं घेरलं आहे की त्यांच्या तावडीतून सुटणंही त्याला शक्य होत नाही आहे. त्याला बिळातून बाहेरही पडता येत नाही आहे. शिकार करायला गेलेला सापच स्वतः शिकार झाला.
animal_lover_wagad इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. मुंग्यांना अशी सापाची शिकार करताना पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. एका युझरने कुणालाही कमजोर समजू नये, अशी कमेंट केली आहे. हे वाचा - OMG! सापालाही फुटली शिंगं; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.