मराठी बातम्या /बातम्या /Viral /

घरात घुसून कोब्राने मारला कोंबडी आणि अंड्यांवर ताव; पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा VIDEO

घरात घुसून कोब्राने मारला कोंबडी आणि अंड्यांवर ताव; पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा VIDEO

कोंबडीने 8 अंडी दिली होती, त्यापैकी 5 अंडी सापाने गिळल्याचं स्थानिकांनी सांगितलं. तसंच या व्हिडीओत कोब्राने कोंबडीही खाल्याचं सांगण्यात आलं आहे. जितेंद्र यांनी त्या घरातून सापाला बाहेर काढल्यानंतर, त्याला मोकळ्या जागी ठेवलं. याचवेळी सापाने गिळलेली अंडी बाहेर काढली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 28 एप्रिल : प्राण्यांचे अधिवास धोक्यात येत असल्याने अनेक जीव-जंतू, प्राणी सिमेंट-काँक्रिटच्या जंगलात शिरू लागले आहेत. विषारी साप उंदीर, छोटे-मोठे जीव खातात. परंतु सापाने कधी कोंबडीची अंडी खाल्याचं पाहिलंय का? यावर कदाचित तुमचा विश्वास बसू शकत नाही, परंतु एका कोब्रा सापाने अंडी खाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मंगळवारी जवळपास 6 फूट लांब कोब्रा साप एका घरात घुसला होता. त्यावेळी सापाने अंडी गिळल्याची ही घटना समोर आली.

छत्तीसगढमधील कोरबा येथील ही घटना आहे. कोरबा येथील जगरहा वस्तीमध्ये अंडी खाणाऱ्या सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जगरहा वस्तीच्या आसपासच्या जंगलात सध्या आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे जीव-जंतू, प्राणी मनुष्य वस्तीत शिरत आहेत. याचदरम्यान एका कोब्रा साप या वस्तीतील एका घरात घुसला. या घरात काही दिवसांपूर्वी कोंबडीने अंडी दिली होती. कोब्रा घरात घुसल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला होता. या सापाला पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. यादरम्यान सापांना रेस्क्यू करणाऱ्या जितेंद्र सारथी यांना या घटनेची माहिती मिळाली.

जितेंद्र सारथी हे त्वरित घटनास्थळी पोहचले. कोंबडीने 8 अंडी दिली होती, त्यापैकी 5 अंडी सापाने गिळल्याचं स्थानिकांनी सांगितलं. तसंच या व्हिडीओत कोब्राने कोंबडीही खाल्याचं सांगण्यात आलं आहे. जितेंद्र यांनी मोठ्या कुशलतेने सापाला बाहेर काढलं आणि जंगलात सोडलं. जितेंद्र यांनी त्या घरातून सापाला बाहेर काढल्यानंतर, त्याला मोकळ्या जागी ठेवलं. याचवेळी सापाने गिळलेली अंडी बाहेर काढली.

(वाचा - तलावात पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हशीवर मगरीचा हल्ला; पुढे जे झालं....पाहा VIDEO)

" isDesktop="true" id="544885" >

सापाने अंडी खाल्ल्याची ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सापाला घरातून, त्या वस्तीतून बाहेर काढल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

First published:

Tags: Poisonous cobra, Viral videos