मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking! खेळणं म्हणून खेळत राहिला; चिमुकल्याला अवाढव्य अजगराने घातला विळखा; थरकाप उडवणारा VIDEO

Shocking! खेळणं म्हणून खेळत राहिला; चिमुकल्याला अवाढव्य अजगराने घातला विळखा; थरकाप उडवणारा VIDEO

अवघ्या 2 वर्षांचा चिमुकला 10 फूट अवाढव्य अजगरासोबत बिनधास्तपणे खेळताना दिसला.

अवघ्या 2 वर्षांचा चिमुकला 10 फूट अवाढव्य अजगरासोबत बिनधास्तपणे खेळताना दिसला.

अवघ्या 2 वर्षांचा चिमुकला 10 फूट अवाढव्य अजगरासोबत बिनधास्तपणे खेळताना दिसला.

मुंबई, 27 डिसेंबर : समोर साधा छोटा बिनविषारी साप दिसला तरी आपल्याला धडकी भरते. अजगर तर दूरचीच गोष्ट. अजगराला आपण प्रत्यक्षात सोडा पण टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत (Viral Video) पाहिलं तरी आपल्याला घाम फुटतो. असं असताना एक चिमुकला मात्र बिनधास्तपणे अशा अजगरासोबत खेळताना दिसला (Child Playing with Python Video).

अजगरासोबत खेळणाऱ्या लहान मुलाचा धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आता तुम्ही म्हणाल की हा खेळण्यातील अजगर असावा. कारण खेळण्यांमध्येही आता असे बरेच नकली प्राणी पाहायला मिळतात. पण नाही हा खराखुरा जिवंत महाकाय अजगर आहे. अवघ्या दोन वर्षांचा चिमुकला त्याच्यासोबत खेळताना दिसला. कधी त्याचं तोंड हातात धरणं, कधी त्याच्यावर बसणं असं काही ना काही हा चिमुकला करत होता.

हे वाचा - Shocking! चालता चालताच पुतळा बनलं जिवंत हरिण; VIDEO पाहूनच हादराल

nature27_12  नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ इंडोनेशियातील आहे. अवघ्या 30 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण अंगावर अक्षरशः काटा येतो.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

व्हिडीओत पाहू शकता जसं एखादं खेळणंच असावं असा हा मुलगा या अजगराशी खेळतो आहे. हा मुलगा जवळपास दोन वर्षांचा दिसतो आहे. तर अजगर तब्बल 10 फूट लांबीचा आणि अवाढव्य असा आहे. मुलगा जेव्हा अजगराच्या मध्ये बसतो तेव्हा अजगराने त्याला विळखा घातलेलाही दिसतो. मुलगा आरामात तिथून बाहेर पडतो. त्यानंतर अजगर त्याच्यापासून दूर जाताच. तो पळत जातो आणि त्याचा फणाच धरतो.

हे वाचा - जमिनीवर झोपून शूट करत होती व्हिडिओ; सापाने चेहऱ्यावर केला हल्ला, थरारक VIDEO

अजगर तो शेवटी अजगर. या चिमुकल्याला त्याने एका क्षणात गिळंकृतही केलं असतं. त्यामुळे व्हिडीओ पाहिल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या आणि पालकांवर रोष व्यक्त केला आहे.

First published:
top videos

    Tags: Python, Small child, Snake, Snake video, Viral, Viral videos