जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! चक्क सिंहासोबत खेळायला गेला चिमुकला; पापी घेत जबड्यात हात टाकताच...

बापरे! चक्क सिंहासोबत खेळायला गेला चिमुकला; पापी घेत जबड्यात हात टाकताच...

बापरे! चक्क सिंहासोबत खेळायला गेला चिमुकला; पापी घेत जबड्यात हात टाकताच...

मांजर-कुत्र्यांसोबत खेळावं तसा हा मुलगा खतरनाक सिंहांसोबत खेळताना दिसला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 12 डिसेंबर : सिंहासमोर भल्याभल्या प्राण्यांचंही चालत नाही. सिंह पाहण्याची कितीही इच्छा असली तरी जंगल सफारी किंवा प्राणीसंग्रहायलात गेल्यावर सिंह समोर दिसताच आपल्याला घाम फुटेल. समोर असूनही त्याच्या जवळ जाण्याची हिंमत काही होणार नाही. असं असताना एक चिमुकला मात्र सिंहासोबत खेळायला गेला. खेळता खेळता त्याने चक्क आपला हातच सिंहाच्या जबड्यात दिला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

कुत्रा, मांजर या प्राण्यांसोबत खेळावं अगदी तसंच सिंहासोबत हा मुलगा खेळायला गेला. एक नव्हे तर दोन सिंह त्याच्याजवळ होते. सिंहाच्या तोंडासमोर त्याने तोंड नेलं आणि खेळता खेळता त्याच्या जबड्यातही हात दिला. त्यानंतर जे घडलं ते शॉकिंग आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक सिंह जमिनीवर बसला आहे. एक मुलगा त्याच्यासमोर आहे. मुलगा सिंहाच्या तोंडासमोर आपलं तोंड नेतो. तेव्हा सिंहही आपला जबडा उघडतो. तेव्हाच आपल्याला धडकी भरते. तितक्यात आणखी एक सिंह तिथे येतो. तोसुद्धा त्या मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मुलगा त्याच्या चेहऱ्याववर आपल्या हातांनी मारतो. त्यानंतर तो सिंहाच्या तोंडात आपला हात देतो. तेव्हा मात्र आपल्या काळजाचं पाणी पाणी होतं. हे वाचा - अरेरे, बिच्चारा! हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्हाला चावणाऱ्या डासाचीसुद्धा येईल दया पण सिंहाने त्या मुलाला काहीच केलं नाही आहे. सिंह एकदम शांत आहे. हे आणखी धक्कादायक आहे. कारण सिंह म्हटला की समोर शिकार दिसला की त्याचा खेळ त्याने संपवलाच समजा. असं असताना हा मुलगा सिंहाच्या इतक्या जवळ असूनही सिंह त्याला काहीच का करत नाही, याचं आश्चर्य तुम्हाला वाटेल. तुम्ही नीट पाहिलं तर हा व्हिडीओ कोणत्या जंगलातील किंवा प्राणीसंग्रहालयातील नाही. तर एका घराजवळील दिसतो आहे. यावरून हे सिंह पाळलेले आहेत.  खरंतर हा मुलगा आणि सिंह एकमेकांसोबत खेळत आहेत.

जाहिरात

@gir_lions_lover इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हे खतरनाक, भयानक आहे. हा मूर्खपणा आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत. हे वाचा - नदीकाठी पाणी प्यायला आलेल्या हत्तीच्या समोर आली मगर आणि मग… पाहा Viral Video तुमची या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात