पलक्कड (केरळ), 06 एप्रिल : 2018 मध्ये खाद्य पदार्थ चोरल्याच्या आरोपावरून केरळमधील एका आदिवासी व्यक्तीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील दोन दोषींनी दाखविलेली सहानुभूती पाहता त्यांना कमी शिक्षा देण्यात आली आहे. या गुन्हेगारांनी पीडित व्यक्ती मधु यास केळी आणि ज्यूस दिला होता. अशा परिस्थितीत न्यायालयाने याकडे ‘मानवतेची भावना’ आणि दोषींना सुधारणेला वाव म्हणून त्यांच्यावरील शिक्षा कमी करण्यात आली आहे.
दोषींना शिक्षा सुनावताना, विशेष एससी/एसटी न्यायालयाने हत्या केलेल्या व्यक्तींनी कायदा हातात घेतल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितल. सुसंस्कृत समाजात याला कधीही प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही तर अशा घटनांचा निषेध केला पाहिजे. यांना या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे.
3 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट, लग्नानंतर अंजली गावी आली आणि….तरीही, न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत म्हटले की हल्लेखोरांमध्ये काही “माणुसकीची भावना” होती आणि त्याना सुधारण्यासाठी वाव आहे. कोर्टाने दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी पीडित मधूला केळी देताना दिसत आहे, तर दुसरा आरोपी एक कप ज्यूस देताना दिसत आहे. न्यायाधीश म्हणाले, “न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून असे समजले आहे की, मधूला मुक्कलीकडे घेऊन जात असताना आरोपी क्रमांक तीनने केळी दिली, तर आरोपी क्रमांक 14 ने एक कप रस दिला.
न्यायाधीश म्हणाले, आरोपी क्रमांक 3 आणि 14 च्या या कृतींवरून हे दिसून येते की आरोपींच्या मनात मानवतेची भावना होती. त्यामुळे आरोपींना सामाजिक बांधिलकीचे नागरिक बनवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
कटिंग करताना केस जास्त कापले; नाराज अल्पवयीन मुलानं संपवलं आयुष्य, ठाण्यातील धक्कादायक घटना