जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / कटिंग करताना केस जास्त कापले; नाराज अल्पवयीन मुलानं संपवलं आयुष्य, ठाण्यातील धक्कादायक घटना

कटिंग करताना केस जास्त कापले; नाराज अल्पवयीन मुलानं संपवलं आयुष्य, ठाण्यातील धक्कादायक घटना

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

एका 13 वर्षांच्या बालकाने कटिंग करताना केस जास्त कापले म्हणून 16 व्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना ठाण्यामधून समोर आली आहे.

  • -MIN READ Thane,Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 6 एप्रिल : भाईंदरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 13 वर्षांच्या बालकाने शुल्लक कारणामुळे आत्महत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. शॉर्ट हेअर कटिंग केली म्हणून नाराज झालेल्या या मुलाने 16 व्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. रात्री कुटुंबातील सर्व व्यक्ती झोपेत असताना या मुलाने बाथरूमच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नाराज झाल्यानं आत्महत्या  घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  भाईंदरमधील एका इमारतीमध्ये एका अल्पवयीन मुलानं आत्महत्या केली आहे. कटिंग करताना केस खूप जास्त कापले, शॉर्ट हेअर कटिंग केली म्हणून हा मुलगा नाराज होता. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे त्याच्या चूलत भावाने त्याची शॉर्ट हेअर कटिंग केली होती, त्यामुळे हा मुलगा नाराज होता. याच नाराजीमधून त्यानं टोकाचं पाऊल उचलं, मंगळवारी रात्री सर्व कुटुंब झोपल्यानंतर त्याने 16 व्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीमधून उडी मारून आपलं जीवन संपवलं.

3 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट, लग्नानंतर अंजली गावी आली आणि….

  तपास सुरू  हा मुलगा शॉर्ट हेअर कटिंग केली म्हणून नाराज होता, त्याने याच नाराजीतून टोकाचं पाऊल उचललं, सोळाव्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीतून उडी मारून त्याने आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणी नवघर पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: thane
  • First Published :
जाहिरात
जाहिरात