मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कोणताच पुरुष तुमच्या जवळ येण्याचीही हिंमत करणार नाही; तरुणीने सांगितला सॉलिड फंडा

कोणताच पुरुष तुमच्या जवळ येण्याचीही हिंमत करणार नाही; तरुणीने सांगितला सॉलिड फंडा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पुरुषांना आपल्यापासून दूर ठेवण्याचा उपाय तरुणीने शोधून काढला आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 13 डिसेंबर : आजही घराबाहेर पडताच महिलांना पुरुषांच्या वाईट नजरांचा सामना करावा लागतो  (Men Flirt with Women). काही वेळा हे पुरुष महिलांसोबत फ्लर्ट करण्याचाही प्रयत्न करतात. अशाच फ्लर्ट करणाऱ्या पुरुषांना आपल्यापासून दूर ठेवण्याचा फंडा एका तरुणीने शोधून काढला आहे (Safety tips for woman). यामुळे पुरुष फ्लर्ट करणं दूर तुमच्या जवळ येण्याची हिंमतही करणार नाहीत (Woman Shares Idea to Keep Away Men at Gym), असा दावा तिने केला आहे (Woman safety tips).

या तरुणीने स्वतः पुरुषांच्या फ्लर्टिंगचा सामना केला आहे. जिममध्ये तिला हा विचित्र अनुभव आला (Men Flirt with Women in Gym). जीम करताना बरेच पुरुष तिच्या आजूबाजूला फिरत राहायचे. एक्सरसाईझमध्ये तिची मदत करण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचे. तिला या सर्वांना वैतागली होती. अखेर  तिने त्यावर स्वतःच उपाय शोधून काढला. तिने या उपायाचा अवलंब करून पाहिला आणि तो यशस्वी झाला. त्यानंतर आता इतर तरुणींनाही तिने आपली ही सॉलिड आयडिया दिली आहे. सोशल मीडियावर तिने आपली ही आयडिया शेअर केली आहे.

हे वाचा - तुमच्या एका नजरेतच कुणीही पडेल तुमच्या प्रेमात! तरुणीने दाखवला डोळ्यांचा जादुई इशारा

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार महिलेने blackmarketbagelsociety या टिकटॉक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत तिने सांगितलं, तिने आपल्या मानेवर ब्राऊन आयशॅडोने एक निशाण केलं  (Woman make love bite on neck with eyeshadow) . दूरून हा निशाण पाहिला तर तो लव्ह बाईटसारखा वाटत होता (Woman make fake love bite on neck) . तिच्या मानेवरील हा खोटा लव्ह बाईटही पुरुषांना खरा वाटू लागला. त्यामुळे पुरुष हिचा बॉयफ्रेंड आहे, असं समजून तिच्या जवळही यायचे नाहीत.

आपण फ्लर्ट करण्यासाठी किंवा रिलेशनशिप बनवण्यासाठी जीममध्ये जात नव्हतो तर आपल्याला फक्त फिट व्हायचं होतं. त्यामुळे कुणी तिच्यासोबत फ्लर्ट केलेलं तिला आवडत नव्हतं म्हणून तिने असं केलं.

हे वाचा - नवरा-बायको दोघांच्याही प्रेमात तरुणी; विचित्र लव्ह स्टोरीचा काय झाला शेवट पाहा

महिलेचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आणखी एका महिलेनेही आपला अनुभव मांडला आहे. ती खऱ्या लव्ह बाईटसह जिममध्ये गेली होती आणि त्यानंतर कोणताच पुरुष तिच्याकडे पाहत नव्हता. त्यामुळे पुरुषांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी महिलेने लढवलेली ही खोट्या लव्ह बाईटची शक्कल नेटिझन्सनाही आवडली आहे.

First published:

Tags: Relationship, Safety, Woman, Woman harasment, Women safety