Home /News /viral /

Shocking! चालता चालताच पुतळा बनलं जिवंत हरिण; VIDEO पाहूनच हादराल

Shocking! चालता चालताच पुतळा बनलं जिवंत हरिण; VIDEO पाहूनच हादराल

थंडीमुळे अशी अवस्था झाली की तुम्ही पाहूही शकत नाही.

  कझाकिस्तान, 06 फेब्रुवारी : थोडी जरी थंडी (Winter) वाढली तरी आपल्याला हुडहुडी भरते. साधा बर्फ हातात घेतला तरी तो काही सेकंदही धरवत नाही.  आपल्याला थोडी थंडी लागली तरी आपण स्वेटर, जॅकेट, स्कार्फ, शाल, ब्लँकेट असं काही ना काही घेऊन आपलं संरक्षण करतो. पण प्राण्यांकडे यापैकी काहीच नसतं. थंडी काय जर बर्फवृष्टी (Snowfall) होत असेल तर या प्राण्यांचं काय होत असेल (Animal in winter). बर्फवृष्टीमुळे भयंकर अवस्था झालेल्या अशाच (Freezing animal) एका हरिणाचा (Freeze deer) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. बर्फापासून (Ice) बनवला जाणारा स्नो मॅन तुम्ही पाहिला असेल. पण अशा या थंडीत बर्फवृष्टीमुळे (snowfall) चक्क जिवंत प्राणीही बर्फाचे पुतळे होतात . जसे आहेत त्याच स्थितीत हे प्राणी अक्षरश: गोठले आहेत. अशाच गोठलेल्या हरणाचा हा व्हिडीओ आहे. जो पाहूनच तुम्ही हादराल. जिवंत हरणाचा चालता चालता पुतळाच झाला आहे. व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर एक हरिण उभं दिसतं आहे. त्याच्या अंगावर बर्फच बर्फ आहे. त्याच्या तोडांवरही बर्फ जमला आहे. हे वाचा - Shocking video! एका हातात तोंड एका हातात शेपटी; जिवंत सापावरूनच मारल्या उड्या तो तिथून पळण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्याचं तोंड आणि शरीरावर बर्फ जमलेलं दिसतं आहे. काही लोक त्याच्या जवळ जाताच तो तिथून पळ काढतो. काही अंतरापर्यंत तो पळत जातो पण पुन्हा गोठतो. तेव्हा त्याला हलताही येत नसतं. अखेर एक व्यक्ती त्या हरिणाला पकडते. तेव्हा पाहू शकता जिवंत हरिणाचा अक्षरशः पुतळा झाल्यासारखंच दिसतं. त्यानंतर त्या हरिणाच्या शरीरावरील बर्फ काढला जातो. तेव्हा कुठे या हरिणाची सुटका होते.
  View this post on Instagram

  A post shared by Meme wala (@memewalanews)

  memewalanews इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. गोठलेलं हरण असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हे वाचा - स्मोकिंगचा भयंकर Video; पाहिल्यानंतर सिगारेट ओढणं सोडा साधं नावही काढणार नाहीत पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या व्हिडीओ कझाकिस्तानचा आहे. जिथं आता तापमान माइनस 56 डिग्री आहे.  नजर जाईल तिथं सगळीकडे बर्फच बर्फच. पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर पसरलेली दिसते. असा बर्फ पाहताच मन प्रफुल्लित होतं, डोळ्यांना आनंद मिळतो. पण वरवर आपल्याला उत्साहीत करणाऱ्या या बर्फामुळे कित्येक प्राण्यांना भयंकर अवस्थेत राहावं लागतं.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Deer, Shocking viral video, Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या