मुंबई, 10 ऑगस्ट : बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या बच्चन (aardhya bachchan) सध्या कोरोनाव्हायरसची लागण झाल्याने चर्चेत होती. कोरोनातून ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी अनेकांनी तिच्यासाठी प्रार्थना केली. आराध्याने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ती तिचे आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासारखंच हिंदी बोलताना दिसते आहे.
सध्या कोरोनाव्हायरसमुळे ऑनलाइन शाळा सुरू आहेत. आराध्या बच्चनही ऑनलाइन धडे घेत आहेत. तिच्या या ऑनलाइन शाळेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती हिंदी बोलताना दिसते आहे. अमिताभ बच्चन यांचं हिंदी भाषेवर किती प्रभुत्व आहे हे आपण सर्वांना माहितीच आहे. त्यांची नातदेखील अगदी त्यांच्यासारखंच हिंदी बोलते. त्यांच्या नातीचा हा हिंदी बोलताना व्हिडीओ आहे.
आराध्या बच्चन किती शिस्तप्रिय आहे हे या व्हिडीओतून दिसून येतं. ती शाळेचा गणवेश घालून, नीट केस बांधून ऑनलाइन शाळेसाठी बसली आहे. यामध्ये ती हिंदीत एका कुत्र्याची गोष्ट सांगताना दिसते आहे. गोष्ट संपल्यानंतर ती चेहऱ्यावर हसू आणत आपल्या शिक्षकाचे आभार मानते. धन्यवाद मिस म्हणताना आराध्या खूपच क्युट वाटते.
हे वाचा - 'खईके पान बनारसवाला'वर छोट्या डॉनचा डान्स; बिग बीही प्रेमात, शेअर केला VIDEO
बच्चन कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोना पॉझिटिव्ह होते. या चौघांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
कोरोनामुक्त झाल्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्या यांनी चाहत्यांचे आभार मानले होते. ऐश्वर्याने आपल्या इन्स्टग्रामवर पोस्ट केली होती. ज्यामध्ये ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींनी आपले हात जोडले होते आणि एक छोटंसं हृदयही बनवलं होतं. अगदी हृदयापासून हात जोडून दोघींनी आभार व्यक्त केला होता.