Home /News /viral /

याला म्हणतात जिद्द! सेरेब्रल पाल्सी असूनही चिमुकलीने खऱ्या अर्थाने गाठली यशाची 'पायरी', VIDEO VIRAL

याला म्हणतात जिद्द! सेरेब्रल पाल्सी असूनही चिमुकलीने खऱ्या अर्थाने गाठली यशाची 'पायरी', VIDEO VIRAL

सेरेब्रल पाल्सीसारख्या (Cerebral Palsy) आजारासमोर या चिमुकलीने हार मानली नाही.

    मुंबई, 10 ऑगस्ट : अपयश ही यशाची पहिली पायरी असतं असं म्हटलं जातं. अशाच अपयशांची पायरी चढून अखेर यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर काय आनंद होतो हे कुणालाच शब्दात व्यक्त करता येणार नाही. असाच आनंद झाला आहे, तो सेरेब्रल पाल्सी (cerebral palsy) असलेल्या एका चिमुकलीला. पहिल्यांदाच जिने चढणाऱ्या या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांना आधाराशिवाय नीट चालताही येत नसतं. अशा परिस्थितीतही ही मुलगी आधाराशिवाय जिने चढली. पहिल्या जिन्यापासून ते शेवटच्या जिन्यापर्यंत ती एकटीच चढत आली आणि अखेर तिला जो आनंद झाला तोदेखील पाहण्यासारखा आहे. अमेरिकन बास्केटबॉलपटू रेक्स चॅपमॅनने हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. "ही सुंदर आणि शूर अशी छोटी मुलगी जिला सेरेब्रल पाल्सी आहे ती पहिल्यांदाच स्वत:हून जिने चढत आहेत. तिच्या चेहऱ्यावरील हसू पाहा", असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे. आपण यशस्वीरित्या केलेली कोणतीही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची असते. विशेषत: जेव्हा त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, अनेक अडचणी आपल्यासमोर येतात, अनेक वेळा आपल्या पदरात अपयश, निराशा पडते आणि अखेर अथक प्रयत्नांनी ती गोष्ट साध्य होतो, तेव्हा ती गोष्ट आपण कधीच विसरू शकत नाही. अगदी छोट्यातला छोटा क्षण का असेना तो आपल्या लक्षात राहतो. हे वाचा - हुशार पोपट! तहान भागवण्यासाठी अशी लढवली शक्कल; सोशल मीडियावर VIDEO VIRAL असंच या मुलीच्या बाबतीच आहेत. ती पहिल्यांदाच आपल्या पायांवर जिने चढते आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ही छोटी गोष्ट वाटत असली तरी तिच्या दृष्टीतून पाहिलं तर तिच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण आहे. व्हिडीओत आपण पाहू शकतो, कोणत्याही आधाराशिवाय फक्त जिन्यांचं साइड रेलिंग पकडून ही मुलगी चालत आहे. एक-एक पाऊल पुढे टाकताना तिच्या चेहऱ्यावरील आनंद, तिचा आत्मविश्वास दिसून येतो. पायऱ्या चढताना ती डगमगते मात्र हार मानत नाही. स्वत:ला सावरत न पडता ती सर्व जिने चढते आणि या यशाची पायरी गाठते. हे वाचा - माकडाच्या हाती आलं गिफ्ट, पुढे काय गंमतीशीर प्रकार घडला पाहा VIDEO फक्त 37 सेकंदाच्या या व्हिडीओ सर्वांचं मन जिंकलं आहे. 2 दशलक्षपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर लाखो लोकांनी लाइक केला आहे. तिच्या जिद्दीला सर्वांनी दाद दिली आहे. तिचं कौतुक केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Social media viral, Viral videos

    पुढील बातम्या