Home /News /viral /

आईने जत्रेतून आणलेली वेताची छडी तोडून फेकली; आता Amazon वर जाहिरात पाहून मुलांना सुटला घाम

आईने जत्रेतून आणलेली वेताची छडी तोडून फेकली; आता Amazon वर जाहिरात पाहून मुलांना सुटला घाम

अमेझॉनवर वेताची छडी (Kane Stick) विकत मिळते. याबाबतचा एक फोटो रेडिट या वेबसाइटवर टाकून काहींनी आश्चर्य व्यक्त केलं आणि सुरू झाली चर्चा.

    मुंबई, 18 सप्टेंबर : सध्या सगळं जग ऑनलाइन झालं आहे. मध्यमवर्गीय घरातील व्यक्तीही अनेक वस्तू म्हणजे शिवणाच्या सुईपासून अगदी लॅपटॉपपर्यंतच्या वस्तू ऑनलाइन विकत घेतात. त्यामुळे ई-कॉमर्स वेबसाइटही (E-Commerce websites) या वस्तूंची जोरदार जाहिरात करतात. पण जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या दंगेखोर मुलांना फटका देण्यासाठी वेताची छडीही तुम्हाला अमेझॉनवर मिळेल तर विश्वास बसेल? पण हे खरंय कारण अमेझॉनवर वेताची छडी (Kane Stick) विकत मिळते. याबाबतचा एक फोटो रेडिट या वेबसाइटवर टाकून काहींनी आश्चर्य व्यक्त केलं आणि सुरू झाली चर्चा. ही चर्चा झाली व्हायरल आणि झाली त्याची बातमी. झी न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. रेडिटवर फोटो पोस्ट केला होता त्यात अमेझॉनवरील वेताच्या छडीशेजारी लिहिलं होतं 'Cane Stick For Beating Kids' (लहान मुलांना फटकवण्यासाठी वेताची छडी). यावर काही युजर्सचा विश्वास बसला नाही कारण मुलांना फटके देण्यासाठी असा या वेताच्या छडीचा उपयोग लिहिला होता. पण काही जणांनी ते तपासून पाहिलं तेव्हा उलगडा झाला की यात किंचितही खोटं काही नाही. त्यानंतर काही यूजर्सनी अमेझॉनच्या वेबसाइटवर सर्चमध्ये (Amazon Search) जाऊन 'केन स्टिक फॉर' असं टाइप केल्यावर Cane Stick For Beating Kids 5 Feet & 3 Feet हा पर्याय दिसू लागला. हा सर्चिंगचा पर्याय पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. त्यामुळे मग चर्चा सुरू झाली. काहींनी आपल्या लहानपणीच्या आठवणी प्रतिक्रियांमध्ये लिहिल्या तर काहींनी असं विचारलं की सध्या ऑनलाईन काहीही मिळू शकतं. हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही अमेझॉनवर या आधी गवत, लाकूडही (Wood) विकण्यात आलं आहे. वेताची छडी विकल्याचं पाहून अनेकांनी अमेझॉनला ट्रोलही करायला सुरुवात केली. हे ही वाचा-अजबच! बाळाचं नाव ऐकूनच सरकारला फुटला घाम; बदलण्याचे दिले आदेश, काय होतं कारण? ही बातमी वाचल्यावर तुम्हाला नक्कीच लहानपणची आठवण झाली असेल. त्या काळात आईवडिल किंवा शाळेतले शिक्षक दंगेखोर मुलांना वेताच्या छडीने फोडून काढायचे. हातांवर, पाठींवर वेताचे वळ उठायचे त्यामुळे आपण केलेली चूक पुन्हा करायची नाही हे विद्यार्थ्यांच्या लक्षात रहायचं. ते योग्य की अयोग्य याची चर्चा तेव्हा होत नसे. आता मात्र मुलांना तसा मार शाळेत किंवा घरी बसत नाही, मग ही छडी कोण विकत घेणार? असा प्रश्नही मनात येऊन गेला असेल. पण असो ज्यांना खरेदी करायची ते करतीलच छडी खरेदी. त्यांच्या मुलांना छडीचा प्रसाद मिळू नये एवढीच इच्छा.
    First published:

    Tags: Amazon, Parents and child, Viral news

    पुढील बातम्या