मुंबई 31 मे: कोविड-19च्या निर्बंधांनंतर पुन्हा सुरू होत असलेल्या अॅडल्ट क्लबमधली (Adult Club) स्थिती कशी आहे, याचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या डेन्मार्कमधल्या 26 वर्षांच्या महिला पत्रकाराने सेक्स करत असताना क्लबमधल्या उपस्थितांचा इंटरव्ह्यू घेतल्याची घटना कोपनहेगनजवळ घडली आहे. एवढंच नव्हे, तर त्या इंटरव्ह्यूची दोन मिनिटांची क्लिप रेडिओवर प्रसारितही झाली. हा इंटरव्ह्यू मार्च महिन्यात रेडिओवरून प्रसारित झाला होता; मात्र आता त्याच्या क्लिप्स सोशल मीडियावरून (Social Media) व्हायरल होऊ लागल्याने त्यावर उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार डेन्मार्कच्या सार्वजनिक प्रसारण यंत्रणेचा भाग असलेल्या ‘रेडिओ 4’ची (Radio 4) पत्रकार लुईस फिशर (Louise Fisher) 2021च्या सुरुवातीला डेन्मार्कची (Denmark) राजधानी कोपनहेगनजवळ (Copenhagen) असलेल्या ईशोजमधल्या स्विंगलँडमध्ये गेली होती. कोविड-19चे निर्बंध उठवल्यानंतर सेक्स क्लब कशा पद्धतीने सुरू झाले आहेत, याचं वार्तांकन करण्यासाठी ती स्विंगर्स क्लबमध्ये (Swingers Club) गेली होती. तिथे तिने काही तास तिथल्या उपस्थितांशी गप्पा मारल्या आणि त्यांची मतं जाणून घेतली. बापरे! जाळ्यात अडकलेल्या एका माशानं मच्छिमाराला बनवलं लखपती, असं काय होतं खास? सुरुवातीला तिच्याकडे असलेला माइक पाहून तिथली मंडळी नर्व्हस झाली होती; मात्र नंतर आपल्या मोकळेपणाच्या वागण्यामुळे त्यांच्या वागण्यातही मोकळेपणा आला आणि त्यांनी तिथे काय काय चालतं, हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी तिला आमंत्रित केलं, असं तिने सांगितलं. इंटरव्ह्यू घेताना सेक्स करण्याचं नियोजन केलेलं नव्हतं; तसा काही दबाव रेडिओच्या कार्यालयाकडूनही आपल्यावर नव्हता; मात्र जिथपर्यंत जग पोहोचू शकत नाही, ते अनुभव लोकांपर्यंत पोहोचवणं हा कामाचा भाग असल्यामुळे आपण प्रत्यक्ष सेक्सचा अनुभव घेताना इंटरव्ह्यू घेतला, असं लुईसने सांगितलं. झटापटीदरम्यान बालकनीमधून खाली कोसळले पती-पत्नी, घटनेचा थरारक VIDEO VIRAL
Radio4 var med, da swingerklubberne igen måtte åbne.
— Radio4 (@radio4dk) May 27, 2021
Advarsel: Det blev hedt og vådt for både vores reporter og gæsterne.
Hør hele reportagen her:https://t.co/B4bFtpThNe #dkmedier #radio4dk pic.twitter.com/RskBTQITYO
दोन मिनिटांचा इंटरव्ह्यू रेडिओवरून प्रसारित झाला. त्यात सेक्सचा अनुभव घेताना ती तिथल्या उपस्थितांना प्रश्न विचारताना ऐकू येतं. तिचे उसासेही ऐकू येतात. हा इंटरव्ह्यू घेण्यासाठी पहिल्यांदा तिला रेडिओ स्टेशनकडून परवानगी मिळाली आणि इतका हॉट इंटरव्ह्यू असूनही तो प्रसारणासाठी नंतर मंजूर झाला. या इंटरव्ह्यूत काय असेल, यासंदर्भात इशाराही रेडिओकडून श्रोत्यांना आधी देण्यात आला होता. मार्च महिन्यात रेडिओच्या मॉर्निंग शोमध्ये तो प्रसारित झाला. हा इंटरव्ह्यू ट्विटरवरही शेअर करण्यात आला. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं आहे, की केवळ चर्चा होण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला आहे. असं करणं अजिबात आवश्यक नव्हतं. अन्य एका युझरने लिहिलं आहे, की ‘अशा गोष्टी केवळ महिलाच करू शकतात. एखाद्या पुरुषाने रेडिओवर सेक्स केला असता, तर पूर्ण देश त्याच्या विरोधात गेला असता.’ लुईसने स्वतः मात्र आपल्याला चांगल्या प्रतिक्रिया आल्याचं सांगितलं. ‘कोपनहेगन पोस्ट’ला तिने सांगितलं, की ‘हा इंटरव्ह्यू प्रसारित झाल्यानंतर लोकांनी फेसबुक, इन्स्टाग्रामवर पत्रकारिता, चांगली पत्रकारिता अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.’