मॉस्को 31 मे : पती-पत्नीमध्ये होणारी भांडणं तर तुम्ही अनेकदा पाहिली असतील. मात्र, आता भांडणांची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. नवरा-बायकोमधील भांडणं इतकी वाढली की दोघांचाही जीव धोक्यात आला. ही घटना रशियाच्या (Russia) सेंट पीटर्सबर्ग येथे घडली आहे. इथे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहाणाऱ्या ओल्गा वोल्कोवा यांचं त्यांच्या पत्नीसोबत भांडण झालं. या दोघांचं भांडणं इतकं वाढलं की दोघंही एकमेकांना मारहाण करू लागले. हे भांडणं घरातून घराच्या बाहेर असलेल्या बालकनीपर्यंत आलं. मात्र, बालकनीमध्ये दोघांचं भांडणं सुरू असतानाच ते फ्लॅटच्या बालकनीमध्ये लावण्यात आलेल्या रेलिंगवरुन 25 फूट खाली असलेल्या जमीनीवर कोसळले. ही घटना पाहून आसपासचे लोक याठिकाणी जमा झाले. यानंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. हे दोघंही सध्या रुग्णालयात दाखल आहेत. आसपासच्या लोकांनी सांगितलं, की रेलिंग इतकी सहज तुटली, की याबाबतचा विचार करणंही कठीण आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) होत आहे. घटनेनंतर पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. सध्या ते याबाबतचा तपास करत आहेत, की रेलिंग इतक्या सहज तुटली कशी?
प्रत्यक्षदर्शी डेनिसनं स्थानिक माध्यमांना सांगितलं, की मी माझ्या एका सहकाऱ्यासोबत चाललो होतो आणि रस्त्याचा व्हिडिओ शूट करत होतो. याच दरम्यान माझं लक्ष बालकनीमध्ये भांडण करत असलेल्या पती-पत्नीवर गेलं आणि हा व्हिडिओदेखील कॅमेऱ्यात कैद झाला. हे दोघंही बालकनीमधून खाली कोसळल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली. यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. यानंतर काही जणांनी रुग्णवाहिका बोलावून या दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं.