जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! जाळ्यात अडकलेल्या एका माशानं मच्छिमाराला बनवलं लखपती, असं काय होतं खास?

बापरे! जाळ्यात अडकलेल्या एका माशानं मच्छिमाराला बनवलं लखपती, असं काय होतं खास?

बापरे! जाळ्यात अडकलेल्या एका माशानं मच्छिमाराला बनवलं लखपती, असं काय होतं खास?

, या माशासाठी 86.4 लाख रुपयांपर्यंतची बोली लागली होती. मात्र, डिस्काऊंट देण्याची परंपरा असल्यानं शेवटी 72 लाखात हा मासा विकला गेला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 31 मे: मासे (Fish) पकडण्यासाठी मच्छिमार पाण्यात जाळं टाकतात मात्र अनेकदा या जाळ्यात माशांशिवाय इतरही अनेक मौल्यवान वस्तू त्यांच्या हाती लागतात. अशा प्रकारच्या अनेक बातम्याही आपल्या वाचण्यात येतात. मात्र, आता समोर आलेल्या घटनेमध्ये एका माशानंच मच्छिमाराला लखपती बनवलं आहे. एक 48 किलोचा दुर्मिळ मासा या मच्छिमाराच्या हाती लागला. मासा किती किमतीत विकला गेला, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. डॉननं दिलेल्या वृत्तानुसार, हा क्रोकर (Croaker) मासा ज्या नावेतून पकडला गेला, त्याच्या मालकाचं नाव साजिद हाजी अबाबकर असं आहे. ग्वादरातील फिशरीजचे उपसंचालक अहमद नदीम यांनी याची पुष्टी केली, की आजपर्यंत त्यांनी इतक्या जास्त किमतीत कोणताही मासा विकला गेल्याचं पाहिलं नाही. हा मासा तब्बल 72 लाख पाकिस्तानी रुपये म्हणजेच 33 लाख भारतीय रुपयांमध्ये विकला गेला आहे. अबाबकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या माशासाठी 86.4 लाख रुपयांपर्यंतची बोली लागली होती. मात्र, डिस्काऊंट देण्याची परंपरा असल्यानं शेवटी 72 लाखात हा मासा विकला गेला. मोठा क्रोकर मासा यूरोप आणि चीनमध्येही अत्यंत महाग आहे. काही मासे आपल्या चवदार मांसामुळे महाग असतात. मात्र, क्रोकर माशाचा औषधं आणि सर्जरीमध्ये वापर केला जातो. यामुळे या माशाची किंमत अधिक आहे. याआधीही अब्दुल हक नावाच्या एका मच्छिमाराला क्रोकर मासा सापडला होता. मात्र, यासाठी त्याला केवळ 7.80 लाख रुपये मिळाले होते. भारतातही मागील वर्षी असाच एक दुर्मिळ मासा आढळला होता. पश्चिम बंगालमध्ये आढळलेला हा मासा तब्बल 800 किलोचा होता. हा मासा 20 लाख रुपयात विकला गेला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: fish
  • First Published :
जाहिरात
जाहिरात