Home /News /viral /

काय सांगता ! आईस्क्रीम चाखण्यासाठी या व्यक्तीला मिळतो कोट्यवधी रुपये पगार, सोन्याच्या चमच्याने चाखतो चव

काय सांगता ! आईस्क्रीम चाखण्यासाठी या व्यक्तीला मिळतो कोट्यवधी रुपये पगार, सोन्याच्या चमच्याने चाखतो चव

रोजच कितीतरी फ्लेव्हर्सचं (Ice Cream Flavors) आईस्क्रीम चाखणाऱ्या जॉन यांना स्वतःला व्हॅनिला फ्लेव्हरचं आईस्क्रीम आवडतं.

    नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : उपजीविकेसाठी माणसं किती वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला पर्याय नसतो. केलेल्या कामाचा मेहनताना म्हणून त्यांना पगार किंवा मानधन दिलं जातं. काम जेवढं क्लिष्ट किंवा कठीण असेल तितकं वेतन अधिक दिलं जातं. रोजंदारीवर काम करणारे मजूर खूप कष्टाचं काम करतात; मात्र अनेक ठिकाणी त्यांना मिळणारं मानधन समाधानकारक नसतं. जगात अशी काही कामं असतात, की ज्यांबद्दल ऐकून खूपच आश्चर्य वाटतं. असंच एक वेगळ्या प्रकारचं काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल आम्ही इथे सांगणार आहोत. ती व्यक्ती काम करते आईस्क्रीमची नेमकी चव सांगण्याचं आणि त्यासाठी त्या व्यक्तीला मिळणारं वेतन कोटीच्या घरात आहे. वाचून खरं वाटत नसलं, तरी हे अगदी 100 टक्के खरं आहे. थंड, चवदार आईस्क्रीम (Tasty Ice Cream) खायला न आवडणाऱ्या व्यक्ती तशा दुर्मिळ असतील. त्यामुळे आईस्क्रीमची चव (Ice Cream Taster) बघण्याचं काम करण्यासाठी कोटीच्या घरात पगार मिळणार असेल, तर कोण ते काम नाकारेल बरं! आणि अशी नोकरी खरंच आहे. अमेरिकेत राहणारे जॉन हॅरिसन (John Harrison) अशाच प्रकारच्या नोकरीतून कोट्यवधी रुपये मिळवतात. त्यांचं काम आहे आईस्क्रीमचा स्वाद घेऊन त्याबद्दलची सविस्तर माहिती कंपनीला द्यायची. त्यानंतरच आईस्क्रीमचा तो फ्लेव्हर बाजारात उतरवायचा की नाही, याचा निर्णय कंपनी घेते. स्वत:चाच मास्क चावू लागला प्रवासी; विमानातील गोंधळाचा VIDEO सोशल मीडियावर Viral जॉन गेली अनेक वर्षं आईस्क्रीम टेस्टर म्हणून काम करतात. 1942 साली जन्मलेल्या जॉन यांचे आजोबा आईस्क्रीमची फॅक्ट्री चालवायचे. त्यामुळे लहानपणापासूनच जॉन यांना आईस्क्रीम खाण्याची आवड लागली. त्यामुळे नंतर त्यांना आईस्क्रीम टेस्टर म्हणून काम करणं सोपं गेलं. 1956 साली त्यांनी ड्रेयर कंपनी जॉइन केली. त्या वेळी ते आईस्क्रीम टेस्टर नव्हते; मात्र त्यांनी केलेल्या सूचनांमुळे आईस्क्रीमचा स्वाद खूपच चांगल्या प्रकारे विकसित होण्यास मदत झाली. त्यामुळे त्यांना टेस्टर म्हणून काम मिळालं. जॉन यांची रोजची शिफ्ट पाच तासांची असे. त्या पाच तासांत ते सुमारे 60 वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीम्स चाखत असत. आईस्क्रीम खाल्ल्यावर चवीचं विश्लेषण करणं आणि त्यात आवश्यक असलेल्या सुधारणा सांगणं हे त्यांचं मुख्य काम होतं. दर दिवशी 20 वेगवेगळ्या फ्लेव्हर्सची आईस्क्रीम्स यायची. प्रत्येक फ्लेव्हरच्या आईस्क्रीममध्ये तीन-चार पर्याय असायचे. त्यामुळे रोजच्या आईस्क्रीम्सची संख्या 60वर जायची. आईस्क्रीम प्लास्टिकच्या चमच्याने खाल्लं, तर त्याची चव बिघडते, असं मानलं जायचं. त्यामुळे जॉन यांना आईस्क्रीमची चव चाखण्यासाठी खास सोन्याचा चमचा (Gold Spoon) असे. त्यांनी त्या कंपनीत जवळपास 200 दशलक्ष गॅलन एवढं आईस्क्रीम खाल्लं होतं. भरमंडपात नवरीने नवरदेवाला रडवलं; नेमकं काय घडलं पाहा VIDEO आपल्या वेगळ्या कामामुळे आणि त्या कामातल्या नैपुण्यामुळे जॉन यांच्या जिभेचं कौतुक होऊ लागलं. त्यांच्या जिभेच्या अमूल्य कौशल्यामुळेच त्यांना एवढा घसघशीत पगार मिळत असल्याने त्यांनी आपल्या जिभेचा तब्बल 14 कोटी 70 लाख रुपयांचा विमा उतरवला आहे. सुरुवातीला जॉन आईस्क्रीमची चव घेण्यासाठी ते आईस्क्रीम खात असत. त्यामुळे त्यांचं वजन खूप वाढू लागलं. त्यामुळे नंतर ते आईस्क्रीमची केवळ चव घेऊन, काही सेकंदांमध्ये त्या चवीविषयीची माहिती नोंदवून ते थुंकून टाकू लागले. रोजच कितीतरी फ्लेव्हर्सचं (Ice Cream Flavors) आईस्क्रीम चाखणाऱ्या जॉन यांना स्वतःला व्हॅनिला फ्लेव्हरचं आईस्क्रीम आवडतं. त्याखालोखाल स्ट्रॉबेरी, कोको आंबा आणि कोकोनट या फ्लेव्हर्सची आईस्क्रीम्स त्यांना आवडतात.
    First published:

    Tags: Viral

    पुढील बातम्या