व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी एकमेकांशेजारी बसले आहेत. नवरीच्या डोळ्यात तसं पाणी आहेच. पण नवरदेवही रडताना दिसतो आहे. हे वाचा - पाठवणीवेळी नवरीबाईने वाजवला नवरदेवाचा बँड; गाडीत बसताच केली धुलाई, VIDEO VIRAL नवरदेवाच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. त्याने आपल्या रडण्यावर बराच कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. पण तरी त्याच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटलाच. नवरीकडे पाहत आपला चेहरा थोडा लपवत तो रडतो आहे. जसं डोळ्यातून पाणी येतं, तसं तो आपल्या हाताना पुसतो. नवरदेवाला रडताना पाहून रडणारी नवरी कसंबसं आपलं रडणं थांबवलं आणि ती त्याचे डोळे पुसू लागते. ती स्वतःच्या चेहऱ्यावर हसू आणत होती जेणेकरून नवरदेव रडणं थांबवले आणि तोसुद्धा हसेल. कारण नवरदेवाच्या रडण्याचं कारणच तेच होतं. हे वाचा - लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीचा भलताच 'खेळ' रंगला; Video पाहून डोक्याला लावाल हात ट्रेंडिग दुल्हनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर दिलेल्या कॅप्शननुसार जेव्हा नवरी रडायला लागली तेव्हा हा नवरदेव तिला रडताना पाहून रडायला लागला, असं सांगण्यात आलं आहे. लग्नातील हा एक इमोशनल आणि रोमँटिक असा क्षण. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. बहुतेकांनी तर आपल्यालाही असाच जोडीदार हवा, अशी भावना व्यक्त केली आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video