जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जे रुग्णालयात सापडला रहस्यमयी बोगदा, Viral Video ने एकच खळबळ

जे रुग्णालयात सापडला रहस्यमयी बोगदा, Viral Video ने एकच खळबळ

व्हायरल फोटो

व्हायरल फोटो

हा सापडलेला बोगदा हा सुमारे 130 वर्षे जुना असून तो ब्रिटिशांनी बांधला होता, एका डॉक्टराला चालताना हा बोगदा सापडला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 4 नोव्हेबर : मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटलच्या खाली बोगद्याचा शोध लागला ही बातमी खरंतर चर्चचा विषय बनली आहे. सर्वत्र या बातमीमुळे खळबळ उडाली आणि या बोगद्यामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी प्रत्येकामध्ये उत्सुक्ता लागून राहिली आहे. येथील डॉक्टर हे रूग्णालयाच्या आवारात फिरत असताना त्यांना एका भिंतीला बोगदा असल्याचे दिसले. ही घटना मुंबईतल्या जेजे रुग्णालयातील आहे. हा सापडलेला बोगदा हा सुमारे 130 वर्षे जुना असून तो ब्रिटिशांनी बांधला होता, असं समोर आलं आहे. रुग्णालयातील लोकांच्या म्हणण्यानुसार, सर जेजे रुग्णालयाचा बोगदा डिलिव्हरी वॉर्डपासून मुलांच्या वॉर्डापर्यंत हा बोगदा आहे. या रुग्णालयात हा बोगदा सापडला आहे, या बोगद्यामध्ये काय आहे किंवा तो कशासाठी केला गेला होता. हे सत्य अजून तरी कळू शकलेलं नाही. सर जेजे रुग्णालयाचा पुरातत्व विभाग संपूर्ण अहवाल तयार करून स्थानिक प्रशासनाला देईल. मुंबईतील जेजे रुग्णालय हे मुंबईमधील सर्वात जुने सरकारी रुग्णालय आहे. हे रुग्णालय देशभरातील गरीब रुग्णांच्या उपचारासाठी ओळखले जाते. ज्यामुळे ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. एवढेच नाही तर बॉम्बस्फोट, दंगली आणि दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक रुग्णांवर या हॉस्पिटलने उपचार केले आहेत. यासोबतच अंडरवर्ल्डनेही या रुग्णालयात रक्तपात केल्याचा या रुग्णालयाचा इतिहास आहे.

जाहिरात

या इमारतीचा इतिहास काय? सर जमशेटजी जीजीभॉय आणि सर रॉबर्ट ग्रँट यांच्या सहकार्याने या इमारती बांधण्यात आल्या आहेत. जमशेटजी जीजीभॉय यांनी १६ मार्च १८३८ रोजी या इमारतीच्या बांधकामासाठी एक लाख रुपये दान केले. 30 मार्च 1843 रोजी ग्रँट मेडिकल कॉलेजची पायाभरणी करण्यात आली आणि त्याच्या बांधकामानंतर 15 मे 1845 रोजी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेटजी जीजीभॉय हॉस्पिटल वैद्यकीय विद्यार्थी आणि रुग्णांसाठी खुले करण्यात आले.

News18लोकमत
News18लोकमत

यापूर्वी 2016 मध्ये राजभवनात भूमिगत बोगदा सापडला सर जेजे रुग्णालयापूर्वी 2016 मध्ये मुंबईतील मलबार हिल येथील राजभवनात ब्रिटिशकालीन बोगदा सापडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनीही त्या बोगद्याला भेट दिली होती. हा बोगदा खुला करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात