मराठी बातम्या /बातम्या /Viral /मेहुणीला पाहून दाजीचा सुटला ताबा; लग्नातच केलं असं काही की पाहुणेही पाहतच राहिले; पाहा VIDEO

मेहुणीला पाहून दाजीचा सुटला ताबा; लग्नातच केलं असं काही की पाहुणेही पाहतच राहिले; पाहा VIDEO

मेहुणी-दाजीच्या जोडीने लग्नात घातला राडा.

मेहुणी-दाजीच्या जोडीने लग्नात घातला राडा.

मेहुणी-दाजीच्या जोडीने लग्नात घातला राडा.

मुंबई, 13 ऑक्टोबर : लग्नात (Wedding video) नवरा-नवरीनंतर (Bride groom video) सर्वाधिक कुणी चर्चेत असते ती म्हणजे मेहुणी (Sister in law). आपल्या दाजींना (Brother in law) छेडताना, त्यांच्यासोबत मजामस्ती करताना दिसते. दाजीसुद्धा आपल्या बायकोसोबत जितकी मस्ती करत नाहीत, तितकी आपल्या लाडक्या मेहुणीसोबत करतात. अशाच एका भावोजी आणि मेहुणीच्या जोडीचा (Jija Saali video) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

मेहुणीला पाहून लग्नातच दाजी तिच्यावर फिदा झाले. त्यांच्या स्वतःवरील ताबा सुटला. मेहुणीजवळ जाऊन त्यांनी लग्नातच सर्वांसमोर असं काही केलं की तिथं उपस्थित असणारा प्रत्येक जण थक्क झाला. या मेहुणी आणि दाजीकडेच पाहत राहिला. आता असं या मेहुणीने नेमकं काय केलं ज्यामुळे दाजी तिला पाहताच आऊट ऑफ कंट्रोल झाला आणि नेमकं त्याने काय केलं ते तुम्ही व्हिडीओत पाहा.

व्हिडीओत पाहू शकता फक्त दोन व्यक्ती नाचताना दिसत आहेत. त्यातील एक तरुणी आहे आणि एक पुरुष आहे. पोस्टनुसार या दोघांमध्ये दाजी-मेहुणीचं नातं आहे.

हे वाचा - लग्नानंतर फळफळलं कपलचं नशीब! हनीमूनऐवजी केलं फक्त एक काम आणि 7 कोटींचे मालक बनले

एका पंजाबी लग्नाचा हा व्हिडीओ आहे. मेहुणी पंजाबी गाण्यावर ठुमके लगावते आहे. मेहुणीचा डान्स पाहून दाजीही इम्प्रेस होतो. तोही तिच्यासोबत गाण्यावर थिरकतो. सोबतच आपल्या खिशातील पैशांच्या नोटा काढून तो तिच्यावर उधळतो. दाजीला मेहुणीचा डान्स इतका आवडला की तो तिच्यावर पैसे उडवतच जातो. यानंतर तिथं उपस्थित असलेले नातेवाईक, पाहुणेसुद्धा हे सर्व पाहतच राहतात.

हे वाचा - VIDEO: वहिनीच्या उत्तरावर दिराची विचित्र रिअ‍ॅक्शन ; ऐकताच भावजयीनं लगावली चापट

पंजाबी कपल इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जर तुम्ही कधी या गाण्यावर आपल्या दाजींसोबत डान्स केला नाही तर काहीच केलं नाही, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. दाजी-मेहुणीचा ही जोडी, त्यांच्यातील बाँडिंग, केमिस्ट्री नेटिझन्सना आवडली आहे.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video