Home /News /viral /

LockDown : एक सोनार झाला भाजीवाला, 25 वर्ष दागिन्यांनी सजलेल्या दुकानात लागले कांदे, बटाटे!

LockDown : एक सोनार झाला भाजीवाला, 25 वर्ष दागिन्यांनी सजलेल्या दुकानात लागले कांदे, बटाटे!

लॉकडाऊनचे परिणाम! 25 वर्ष दागिने विकणाऱ्या सोनाराला घरच्यांचे पोट भरण्यासाठी भाजी विकावी लागत आहे.

    जयपूर, 07 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळं हजारो मजूर परराज्यांमध्ये अडकले आहे. आपलं घर गाठण्यासाठी मिळेल ते वाहन नाही तर पायी हजारो किमी प्रवास करत आहेत. तर, दुसरीकडे काही लोकांचे काम बंद असल्यामुळं खायला दोन वेळचं अन्न नाही आहे. अशा सगळ्या परिस्थितीत हिम्मत राखत जयपूरमधील एक व्यवसायिकानं एक उपाय शोधला. जयपूरमध्ये राहणारे हुकुमचंद सोनी हे गेली 25 वर्ष सराफाचे काम करतात. अगदी लाखोंचा उलथापालथ त्यांच्या दुकानात रोजची होती. मात्र लॉकडाऊनमुळे सध्या दोन वेळचं अन्नही मिळेनासं झालं आहे. अशा परिस्थितीत हातावर हात धरून बसण्यापेक्षा सोनी यांनी भाजी विकण्याचा निर्णय घेतला. वाचा-काय म्हणायचं याला! वाईन शॉपमध्ये घुसला आणि 95 हजारांची दारू घेऊनच पडला बाहेर जयपूरच्या रामनगर परिसरात असणाऱे हे दुकान कधी काळी दागिन्यांनी सजलेले होते. आता या दुकानात बटाटे आणि कांदे विकले जात आहे. PTI शी बोलताना हुकुमचंद यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी भाजी विकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सांगितले की, दागिण्याच्या दुकानामुळं घर चालत होते, मात्र आता लॉकडाऊनमुळं फक्त हा एकच मार्ग आहे. त्यामुळं भाजी विकण्याचा निर्णय घेतला. हुकुमचंद यांनी सांगितले की, "एवढे दिवस घरी बसून काय करणार, खायला कोण देणार? त्यामुऴं नाइलाजास्तव भाजी विकावी लागत आहे. हुकुमचंद यांच्या घरात ते एकटे कमवते असल्यामुळं घरचा गाडा पुढे घेऊन जाण्यासाठी काहीतरी त्यांना करावे लागणार होते. म्हणून त्यांनी भाजी विकण्याचा निर्णय घेतला. वाचा-संपूर्ण मुंबई महानगराला भाजीपाला पुरवणाऱ्या बाजारातच घुसला कोरोना व्हासरस घरी बसून काही न करण्यापेक्षा काही तरी करणं फायद्याचं असतं, असेही हुकुमचंद म्हणाले. हुकुमचंद सकाळ संध्यकाळ मास्क लावून भाजी विकतात. त्याचबरोबर सामाजिक अंतर आणि लॉकडाऊनच्या नियमांचेही पालन करतात. वाचा-लॉकडाऊनमध्ये असे होत आहेत विवाह सोहळे, 'या' देशाने सुरू केली खास सुविधा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या