Home /News /videsh /

ना वरात, ना वऱ्हाडी! लॉकडाऊनमध्ये असे होत आहेत विवाह सोहळे, 'या' देशाने सुरू केली खास सुविधा

ना वरात, ना वऱ्हाडी! लॉकडाऊनमध्ये असे होत आहेत विवाह सोहळे, 'या' देशाने सुरू केली खास सुविधा

एकीकडे लॉकडाऊनमुळे विवाह सोहळे रद्द झाले असताना या देशामध्ये मात्र सर्वात जास्त विवाहाची नोंद झाली आहे.

    रियाद, 05 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अर्थातच लॉकडाऊन असल्यामुळं सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत, एवढंच नाही तर लग्न संमारंभही पुढे ढकलण्यात आली आहेत. असे असताना सौदी अरेबिया (Saudi Arabia) या देशात मात्र लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त लग्न झाल्याची नोंद आहे. येथील न्याय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सौदीच्या राजधानी असलेल्या रियादमध्ये (Riyad) तब्बल 542 ऑनलाइन लग्न झाली आहेतक. 'अल-अरबिया नेट' या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, न्याय मंत्रालयाच्या वतीनं कोर्टात न जाता लोकांना लग्न करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन विवाह ही सेवा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत लोकांना कोर्टात जाण्याची गरज नसणार आहे तर, संपूर्ण कागदपत्रे ही ऑनलाइन मिळतील. लग्नाची तारीख, वेळ यासर्व बाबीही ऑनलाइन ठरवल्या जातात. वाचा-इंग्रजी येत नसून बनले लोकप्रिय ZOOM अ‍ॅपचे सर्वेसर्वा,आज 48.44 हजार कोटी संपत्ती विवाह प्रमाणपत्रही मिळते ऑनलाइन एवढेच नाही तर नवविवाहित जोडप्यांने विवाह प्रमाणपत्रही ऑनलाइन देण्याची सोय करण्यात आली आहे. लग्न झाल्यानंतर त्यांना काही कागदपत्र ऑनलाइन पाठवली जातात, त्यांवर स्वाक्षरी करून विवाहप्रमाणपत्र देण्यात येते. यासाठी निश्चित फीही घेतली जाते. या ऑनलाईन विवाहसोहळ्यांचा एक फायदा म्हणजे नवीन विवाहित व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात जाण्याची गरज नाही, परंतु हे कामही ऑनलाइन केले जाते. याचा एक फायदा म्हणजे स्थानिक नागरिकांना नागरी व्यवहार विभागात लग्नाची नोंद घ्यावी लागते. मग लग्नाची नोंदणी देखील ऑनलाइन केली जाते आणि यासाठी स्वतंत्र कारवाई करण्याची आवश्यकता नाही. वाचा-माऊलीला सलाम! लेकीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी देश सेवेसाठी सज्ज झाली ही कोरोना
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या