भरधाव ट्रकनं दोन कारना उडवलं, पाहा भीषण अपघाताचा LIVE VIDEO

भरधाव ट्रकनं दोन कारना उडवलं, पाहा भीषण अपघाताचा LIVE VIDEO

या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत.

  • Share this:

पुलवामा, 14 ऑगस्ट : भरधाव ट्रकनं महामार्गावर दोन कारना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. जम्मू-श्रीनगर महामार्गावर पंपोर परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार भरधाव ट्रकने बोलेरो आणि स्विफ्ट कारला उडवलं. ही धडक एवढी जबरदस्त होती की महामार्गावर दोन गाड्यांसह ट्रकही उलटा झाला. स्विफ्ट कारमधून चार जण प्रवास करत होते. त्यापैकी दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचा-बाइक नाही दिली म्हणून रागात 100 फूट उंच विजेच्या खांबावरून मारली उडी

या व्हिडीओमध्ये पाहू शकता समोरून येत असलेल्या भरधाव ट्रकनं दोन कारनं धडक दिली आहे. या कारची दिशा बदलून गेली आणि ट्रकही रस्त्यावर उलटा झाला. या ट्रकमध्ये असलेली माती खडी देखील रस्त्यावर आली. या अपघातात जखमी झालेल्यांना एसडीएच पंपोर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन जणांचा मृत्यू झाला असून ते अवंतीपुरा परिसरातील रहिवासी होते अशी माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 14, 2020, 8:48 AM IST

ताज्या बातम्या