जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'जय श्री राम म्हणावंच लागेल'; भंगार विकणाऱ्या वृद्ध मुस्लिमाला तरुणांकडून धमकी; VIDEO समोर आल्यानंतरही..

'जय श्री राम म्हणावंच लागेल'; भंगार विकणाऱ्या वृद्ध मुस्लिमाला तरुणांकडून धमकी; VIDEO समोर आल्यानंतरही..

'जय श्री राम म्हणावंच लागेल'; भंगार विकणाऱ्या वृद्ध मुस्लिमाला तरुणांकडून धमकी; VIDEO समोर आल्यानंतरही..

हिंदू गावात शिरला म्हणून मुस्लीम व्यक्तीला त्रास दिल्याच्या धक्कादायक प्रकाराचा VIDEO चीड वाढवणारा आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 29 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अल्पसंख्यांक समुदायातील लोकांवर विविध हल्ले आणि जबरदस्तीने जय श्री राम (Jai shree Ram) म्हणण्याच्या घटनांनंतर आता राज्यासह केंद्रावरही तोफ डागली जात आहे. रविवारी उज्जेनमधून अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवराज सरकारवर टीका केली. दुसरीकडे भाजपने उलटपक्षी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला. आणि या व्हिडीओंचा स्त्रोत विचारला. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी लिहिलं आहे की, मध्यप्रदेशातील इंदूर, देवास आणि आता उज्जेनमधील महिदपूरमधील घटना समोर आली आहे. हे कोण लोक आहेत, जे सातत्याने असं कृत्य करीत आहेत. आपल्या देशातील बांधवांना आणि संस्कृतील बिघडवण्याचं काम करीत आहेत. कोणत्या तरी खास हेतूने हे सर्व केल्यासं वाटत आहे. पुढे सरकारवर टीका करीत ते म्हणाले की, सरकार मूक गिळून हे सर्व पाहत आहे. संपूर्ण प्रदेशात अराजकता पसरली आहे आणि कायद्याचं बंधन राहिलेलं नाही. (Jai Shri Ram has to be said Young men threaten elderly Muslim who was selling scrap metal video viral ) हे ही वाचा- इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेला BJP नेता चोरी करताना CCTV मध्ये कैद; Video Viral

उज्जेनमध्ये भंगार विकणाऱ्याला केली जबरदस्ती

जाहिरात

उज्जेनमध्ये भंगार विकणाऱ्या एका व्यक्तीला जबरदस्तीने जय श्री रामची घोषणा देण्यास सांगण्यात आलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरु एका वृद्ध व्यक्तीला जबरदस्तीने जय श्री रामची घोषणा देण्यास सांगत होते. हे तरुण त्या व्यक्तीचं भंगाराचं सामानदेखील खाली फेकत असल्याचं दिसत आहे. याशिवाय पुन्हा या गावी यायचं नाही, अशीही त्याला धमकी देण्यात आली. या प्रकरणात सध्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात