• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेला BJP नेता चोरी करताना CCTV मध्ये कैद; Video Viral

इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेला BJP नेता चोरी करताना CCTV मध्ये कैद; Video Viral

भाजप नेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 • Share this:
  हिमाचल प्रदेश, 28 ऑगस्ट : हमीरपुरमधून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या CCTV मध्ये एका भाजप युवा नेता दुकानातून चोरी करीत असल्याचं दिसून येत आहे. या युवा नेत्याने NIT मधून शिक्षण घेतलं आहे. हमीरपुर जिल्ह्यात भाजप युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्याला चोरीच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दुकानातून गाडीच्या लाइट्स, डाटा केबल, मोबाइल चार्जर स्टँड आणि एलईडी लाइट्ससह 18 हजार रुपयांचं सामान चोरी केलं होतं. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (An engineering educated BJP leader was seen on CCTV stealing video vira) हे ही वाचा-शर्टाच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलने अचानक घेतला पेट; CCTV मध्ये कैद झाला VIDEO याशिवाय पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेलं सर्व सामान जप्त केलं आहे. आरोपीला हमीरपूर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. या प्रकरणात हमीरपूरमधील वॉर्ड नंबर 9 मधील राहणारे सुभाष चंद्र यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीने एनआयटी हमीरपूरमधून इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. पोलीस अधिक्षक डॉ. आकृती शर्मा यांनी या प्रकरणात पुष्टी केली आहे. पोलिसांनी चोरीच्या आरोपात हमीरपूरमधील मुकुल ठाकूरला अटक केली आहे.  
  Published by:Meenal Gangurde
  First published: