मुंबई, 15 मार्च : लहान मुलं म्हणजे खेळणी आलीच. मुलगा असो वा मुलगी प्रत्येक मुलाजवळ एक तरी डॉल म्हणजे बाहुला किंवा बाहुली असते. एका महिलेनेही आपल्या मुलांसाठी असाच एक बाहुला खरेदी केला. पण हा बाहुला घरी आणल्यानंतर तिला त्यामध्ये असं काही विचित्र दिसलं की तिला घाम फुटला (Weird dolls) .
ऑस्ट्रेलियात राहणारी एजलिंग (Aisling) दोन मुलांची आई आहे. तिने नुकतंच एका फेसबुक ग्रुपवर आपल्या मुलाच्या डॉलबाबत एक धक्कादायक किस्सा शेअर केला आहे. ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहे (Mother found strange mark on child’s doll).
तिने पोस्टमध्ये सांगितलं की तिने आपल्या लहान मुलासाठी एक बाहुला आणला. ज्याची किंमत 2 हजार रुपयांपेक्षाही जास्त होते. हा बाहुला अगदी हुबेहुबे लहान बाळासारखा दिसतो होता. त्याच्यामध्ये साऊंड सिस्टमही आहे, ज्यामुळे तो बोलतो (Australian woman found weird mark on doll) .
पण या बाहुल्यात तिला काहीतरी विचित्र असल्याचं दिसलं. ज्यामुळे ती शॉक झाली. त्या बाहुल्याच्या डोक्यावर मागे एक काळ्या रंगाचा डाग आहे. हा डाग कोणत्याही किड्याचा नाही, कोणत्या कचऱ्यामुळे लागलेला नाही किंवा जळाल्याचा नाही. डागाचा वास घेतल्यानंतर त्यातून काही विचित्र वासही येत नाही आहे. पण हा डाग हळूहळू वाढताना दिसतो आहे, असा दावा या महिलेने केला आहे.
हे वाचा - खाताच तोंडातून येतो घोड्याच्या पळण्याचा आवाज; विचित्र समस्येमुळे तरुणी हैराण
त्यामुळे हे कोणत्या धोक्याचे संकेत तर नाही ना, अशी भीती तिला वाटू लागली. तिने फेसबुकवर या बाहुल्याचा फोटो टाकला आणि कुणाकडे असं बाहुलं आहे का ते विचारलं आहे.

महिलेची ही पोस्ट पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर आपल्या बऱ्याच कमेंट दिल्या आहेत. बहुतेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काही जणांनी या डागाबाबत आपापली मतंही व्यक्त केली आहेत. काही लोकांनी सांगितलं की जर या बाहुल्यात साऊंड सिस्टम आहे, तर ते त्याच्या डोक्यात फुटलं असावं ज्यामुळे बाहेर असा जळल्याचा डाग आला असावा. त्यानुसार या महिलेने बाहुल्याच्या डोक्याच्या वरील भागाचं आवरण कापूनही पाहिलं. ज्याचा फोटोही तिने शेअर केला. तर यामध्ये बाहुल्याच्या फक्त वरील लेअरवरच असा डाग असल्याचं दिसतं आहे. त्याच्या आत काळा डाग नाही. त्यामुळे हा डाग नेमका कुठून आला हे रहस्यच आहे.
हे वाचा - याला म्हणतात नशीब! बाजारात फुगे विकायची तरुणी; एका फोटोनं रातोरात बदललं आयुष्य
बहुतेक युझर्सनी महिलेला जर या बाहुल्यापासून तिच्या मुलांना धोका असल्याचं वाटत असेल तर तिने तात्काळ हा बाहुला फेकून द्यावा असा सल्ला दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.