मुंबई, 23 फेब्रुवारी : सोशल मीडियावर रोज नवनवे फोटोज, व्हिडिओज व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानातील मुलीचा व्हिडिओ व्हायरल (Pakistani girl video viral) झाला होता.
यात ती मुलगी 'ये हम है, ये हमारी कार है और यहां हमारी पावरी हो रही है' असं म्हणताना दिसली. हा व्हिडिओ (Pawri video)अजूनही सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घालतो आहे. या मुलीचा बोलण्याचा अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडला. तिचा तो डायलॉग (dialogue) घेऊन अनेकांनी आपले मिम्स (memes) आणि व्हिडिओज (videos) बनवले. अजूनही हे सत्र थांबलेलं नाही.
सामान्य लोक, फिल्मी सेलिब्रिटीज(film celebrities), सैन्यातले जवान(military jawans), डॉक्टर्स (doctors)अशा अनेकांना आपले व्हिडिओजबनवण्याचा मोह आवरला नाही. आता असाच एका व्हिडिओ आला आहे पोलिसांचा(police).
So where is #Pawri tonight 😁😁 pic.twitter.com/UcXrahGGcx
— Pankaj Nain IPS (@ipspankajnain) February 21, 2021
हा व्हिडिओ आयपीएस ऑफिसर पंकज नैन (IPS officer Pankaj Nain) यांनी सोशल मीडियावर (Twitter) टाकला आहे. या व्हिडीओला त्यांनी गमतीदार कॅप्शनही दिलं आहे, 'सो व्हेअर इज द पावरी टुनाईट?' या व्हिडिओत तीन पोलीस बसलेले आहेत. त्यांच्याजवळ एक पोलिसांची जीप उभी आहे. आणि एक पोलिसवाला म्हणतो आहे, 'ये हम है, ये हमारी जीप है और हम पार्टी करनेवालोंका इंतजार कर रहें हैं.'
हेही वाचा VIDEO : मुंबईतील चाहत्याचा रजनीकांत डोसा सुपरहिट; अशी स्टाईल पाहिली नसेल कधी
हा व्हिडिओ गंमतीगमतीत कोरोनाकाळात (corona times) पार्टी न करता सगळे नियम पाळण्याचा अप्रत्यक्ष संदेशच देतो आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल (video viral) झाला असून आतापर्यंत 18 लाखाहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. 2 हजार लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं आहे, 'पावरी पडेल भारी' अनेकांनी यावर मजेदार कमेंट्स केलेल्या दिसतात.