VIDEO : मुंबईतील चाहत्याचा रजनीकांत डोसा सुपरहिट; अशी स्टाईल पाहिली नसेल कधी

VIDEO : मुंबईतील चाहत्याचा रजनीकांत डोसा सुपरहिट; अशी स्टाईल पाहिली नसेल कधी

मुंबईतील हा डोसा खाण्याबरोबरच पाहण्यासाठीही लोक गर्दी करतात.

  • Share this:

जर तुम्हाला मुंबईतील स्ट्रीट फूड प्रेमी असाल तर (Mumbai Street Food) तुम्ही प्रसिद्ध मुथु डोसा कॉर्नरला भेट दिलीच असेल. (Muttu Dosa Corner) येथील मसाला डोसा आणि मैसूर डोसा जगात भारी असल्याचं म्हटलं जातं. येथील चवीबरोबरच तयार करण्याची पद्धत लोकांना आकर्षित करते. त्यांचा डोसा सर्व्ह करण्याची वेगळी स्टाइल आहे. दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) याच्याकडून प्रेरणा घेऊन स्टॉलचे मालिक मशीनप्रमाणे डोसा तयार करतात. मुथु रजनीकांतचे मोठे फॅन आहेत. त्यामुळे त्यांनी तयार केलेल्या डोशाला रजनीकांत स्टाइल डोसा (Rajinikanth Style Dosa) असं नाव दिलं आहे. सोशल मीडिया (Social Media) वर हा व्हिडिओ व्हायरल होत (Viral Video) आहे.

स्ट्रीट फूड रेसिपी नावाच्या एका फेसबुक पेजने डोसा तयार करण्याचा व सर्व्ह करण्याच्या पद्धतीचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. पाहा व्हिडिओ...

या व्हायरल व्हिडिओला 1 लाखांहून अधिक शेअर आणि 20 हजारांहून अधिक कमेंट मिळाल्या आहेत. यावर लोक मजेशीर कमेंट्स करीत आहेत. यावर एका युजरने लिहिलं आहे की, हा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट डोसा आहे. मुथु अंकल हसत-खेळत डोसा अधिक टेस्टी बनवतात. मी लहानपणापासून येथे येत आहे. मात्र कोणत्याही हॉटेलमध्ये असा डोसा खायला मिळत नाही.

हे ही वाचा-Tiktok स्टार समीर गायकवाडचा शेवटचा व्हिडीओ आला समोर, म्हणाला 'आपण लोक...'

दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे, ज्या पद्धतीने ते डोसा सर्व्ह करतात, ते पाहायला मजा येते. प्लेल सरकवून ते पुढे ढकलतात. जर तुम्हालाही या डोशाचा स्वाद घ्यावयाचा असेल तर तुम्ही दादरमधील हिंदमाता येथील मुथु डोसा कॉर्नरवर जाऊ शकता.

Published by: Meenal Gangurde
First published: February 23, 2021, 8:22 AM IST

ताज्या बातम्या