नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: माणसाने विज्ञानाच्या (Science) सहाय्याने चंद्रावर (Moon) पाऊल ठेवलं आणि अनादी अनंत असलेल्या अंतराळ विश्वाचे (Space) कवाड त्याच्यासाठी खुले झाले. तेव्हापासून आजतागायत अंतराळ विज्ञानात (Space Science) सतत प्रगती होत आहे. आता दुसऱ्या ग्रहावर (Planet) मानवी वस्ती वसवण्याची स्वप्नं माणूस पाहू लागला आहे. यासाठी सातत्याने अंतराळ विज्ञानात नवनवे प्रयोग (Experiment) केले जात आहेत. अंतराळात विविध स्पेस स्टेशन्स (Space Stations) निर्माण करण्यात आली असून अनेक महिने अंतराळवीर तिथे राहून विविध प्रयोग करतात. अमेरिकेची (USA)अंतराळ संशोधन संस्था नासाच्या (NASA) आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर भाज्या (Vegetables) पिकवण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून, अंतराळवीरांनी खाण्यापिण्याच्याबाबतीतही काही प्रयोग केले आहेत. नुकतेच याबाबतचे काही फोटो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या नासाच्या अंतराळवीर मेगन मॅकआर्थर (Megan Mcarthur) यांनी शेअर केले आहेत. त्यामुळे अंतराळातील आयुष्य कसं असतं, अंतराळवीर अंतराळ यानात कसे राहतात, काय खातात याबद्दलचे सामान्य माणसाचे कुतूहल शमण्यास मदत झाली आहे. लाईव्ह हिंदुस्थानने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
Friday Feasting! After the harvest, we got to taste red and green chile. Then we filled out surveys (got to have the data! 😁). Finally, I made my best space tacos yet: fajita beef, rehydrated tomatoes & artichokes, and HATCH CHILE! https://t.co/pzvS5A6z5u pic.twitter.com/fJ8yLZuhZS
— Megan McArthur (@Astro_Megan) October 29, 2021
मेगन मॅकआर्थरने शेअर केलेल्या फोटोमध्ये रोटीसारखा एक पदार्थ (Food) हवेत उडताना दिसत असून, त्यात काही भाज्या असल्याचे दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्विटरवर हा फोटो शेअर करताना मेगन मॅकआर्थरने लिहिलं आहे की, पीक कापणीनंतर आम्हाला लाल आणि हिरव्या मिरच्यांचा (Chilli) आस्वाद घेता आला आहे. आम्ही सर्वोत्तम स्पेस टॅको (मेक्सिकन खाद्यपदार्थ) बनवले आहे. हेही वाचा- Shocking Video: सिंहासमोर जमिनीवर झोपून फोटो काढत होता फोटोग्राफर अन्…; पाहा पुढे काय घडलं
यात उल्लेख केलेल्या मिरच्या अंतराळात उगवण्यात आल्या आहेत. या मिरच्या शिमला मिरचीसारख्या आहेत. पृथ्वीपासून इतक्या अंतरावर उगवलेल्या या पिकाचं यश साजरं करण्यासाठी अंतराळवीरांनी एक टॅको पार्टी (Taco Party) केली. त्यावेळचे हे फोटो आहेत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने चार महिन्यात अंतराळात मिरचीचे रोप तयार करून मिरची पिकवली आहे. न्यू मेक्सिकोच्या हॅच व्हॅलीमध्ये (New Mexico Hatch Valley) शोध लागलेल्या एस्पॅनोला जातीच्या मिरचीपासून हे मिरचीचे पीक घेण्यात आले आहे. ही मिरची हिरव्या आणि लाल अशा दोन्ही रंगाची असते. मात्र अंतराळात मिरची पिकवणं हे इतर पिकांच्या तुलनेत अवघड असल्याचं नासानं म्हटलं आहे. अंतराळात मिरचीशिवाय चायनीज कोबी, रशियन केल, लेट्युसही पिकवण्यात यश आलं आहे. मेगन मॅकआर्थर एप्रिल 2021 पासून अंतराळात असून, अंतराळात उगवलेल्या वनस्पतींमध्ये हिरवी मिरची हे सर्वात नवीन पीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- बापरे! मृत्यूनंतर हरणानं घेतला बदला; घाबरून बिबट्यानं ठोकली धूम, पाहा VIDEO
अंतराळ विज्ञानात झालेली ही प्रगती सर्वसामान्य माणसाला थक्क करणारी आहे. अंतराळात पेस्टसदृश्य पदार्थ खाऊन राहावं लागतं असं आपण शिकत आलो आहोत, मात्र आता त्यात झालेला हा बदल आश्चर्यकारक आहे.