मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चोरी करण्यासाठी घरात शिरला पण सुंदर महिला दिसतात बदललं चोराचं मन आणि मग...

चोरी करण्यासाठी घरात शिरला पण सुंदर महिला दिसतात बदललं चोराचं मन आणि मग...

एक चोर चोरीच्या उद्देशाने घरात शिरला. मात्र घरात सुंदर महिला दिसताच त्याचं मन बदललं.

एक चोर चोरीच्या उद्देशाने घरात शिरला. मात्र घरात सुंदर महिला दिसताच त्याचं मन बदललं.

एक चोर चोरीच्या उद्देशाने घरात शिरला. मात्र घरात सुंदर महिला दिसताच त्याचं मन बदललं.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : चोरीचं एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलं (Weird Incident of Theft) आहे. कधी तुम्ही असं ऐकलं आहे का की चोर चोरी करण्याच्या उद्देशाने एखाद्या घरात शिरला मात्र घरात सुंदर महिला पाहून त्याचं मन बदललं. असंच एक प्रकरण आता बिहारची (Bihar) राजधानी पाटणा येथून समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाटणाच्या विमानतळ ठाण्याच्या चौधरी टोला परिसरात एक चोर चोरीच्या उद्देशाने घरात शिरला. मात्र घरात सुंदर महिला दिसताच त्याचं मन बदललं. यानंतर चोर महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. यादरम्यान महिला ओरडू लागल्याने घाबरून त्याने घरातून पळ काढला. दुकानात शिरून चोरी केली पण CCTV वर नजर पडताच करू लागला डान्स; हा VIDEO एकदा बघाच स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चोरी करणारा हा व्यक्ती चौधरी टोला परिसरातील रहिवासी आहे आणि त्यानं आपल्याच परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोर जेव्हा घरात शिरला तेव्हा ही महिला आपल्या मुलांसोबत झोपली होती. तेव्हाच तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. जाग येताच महिला जोरजोरात ओरडू लागली. घाबरून हा चोर घरातून पळ काढत असतानाच आसपास फिरत असलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं. महिलेकडून खात्री करून घेतल्यानंतर पोलिसांनी चोराविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आणि त्याला तुरुंगात पाठवलं. ऑनलाईन मीटिंगदरम्यानच व्यक्तीनं काढले आपले कपडे अन्...; विचित्र घटनेचा VIDEO याप्रकरणी पोलीस ठाण्याचे अधिकारी अरुण कुमार यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की शनिवारी सौरव नावाचा एक व्यक्ती त्यांच्या परिसरातील एका घरात घुसला. घरात एक महिला आपल्या मुलांसोबत झोपली होती. चोराने उशीखाली हात घालून कपाटाची चावी काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला 10 हजारांचे बंडल सापडले. यादरम्यान महिलेला जाग आली. महिलेला पाहताच चोराचं मन बदललं आणि त्यानं महिलेसोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली. चोर घाबरून घरातून पळू लागला इतक्यात बाहेरच ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं.
First published:

Tags: Shocking news, Theft

पुढील बातम्या