गावगुंडांची शेतकऱ्याला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण, धक्कादायक VIDEO आला समोर

गावगुंडांची शेतकऱ्याला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण, धक्कादायक VIDEO आला समोर

जुनी कुरापत काढून अचानक गावातील दारू पिलेल्या व्यक्तींनी अशोक करपे यांना शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली.

  • Share this:

बीड, 14 जुलै : जुन्या वादाच्या शुल्लक कारणावरून एका शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्हयातील जवळबन येथे घडली आहे.  दिवसा ढवळ्या भर-रस्त्यात गावातील चार पाच लोकांकडून बेदम मारहाण करताना चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिमध्ये हे पाच जणांचे टोळके शेतकऱ्याल लाथा बुक्या आणि दगडाने मारहाण करताना दिसत आहेत. या मारहाणीत शेतकरी प्रशांत करपे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

केज तालुक्यातील जवळबन येथील शेतकरी अशोक करपे हे पिकाला खत आणि औषधं विकत घेण्यासाठी चालले होते. त्यावेळी  जुनी कुरापत काढून अचानक गावातील दारू पिलेल्या व्यक्तींनी अशोक यांना शिवीगाळ  केली. त्यानंतर या पाचही जणांनी अशोक करपे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अशोक खाली कोसळले. त्यानंतरही या टोळक्याने  लाथा बुक्या आणि दगडाने मारहाण केली. यात बेशुद्ध झाल्यावर मारहाण करणारे हे टोळके शिव्या देत निघून गेले.

SPECIAL REPORT : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात 'मातोश्री'चा वरचष्मा!

अशोक यांना बेशुद्ध अवस्थेत  तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अचानक झालेल्या मारहाणीमुळे करपे कुटुंब दहशतवादी खाली आहे. गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करा, अशी मागणी कुलदीप करपे यांनी केली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Published by: sachin Salve
First published: July 14, 2020, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading