मुंबई, 14 जुलै : लॉकडाउनच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे खळबळ उडाली होती. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 10 पोलीस उपाआयुक्तांच्या बदल्या केल्या. त्यामुळे त्यांना ‘मातोश्री’वर जाऊन स्पष्टीकरण द्यावे लागले होते आणि रद्द केलेल्या बदल्या पुन्हा कायम करण्यात आल्या. त्यामुळे काही दिवसांतच राज्य पोलीस दलात होणाऱ्या अंतर्गत बदल्यांवर ‘मातोश्री’चा वरचष्मा असेल यात काही शंका नाही. हे नाट्य संपत नाही तोच कोविड-19 मुळे मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या आणि बढत्याचे वेध राजकीय नेत्यांना लागले आहे. त्यामुळेच कोविड–19 साठी नाहीतर कोण अधिकारी कुठे असेल, कुठे त्याची बदली करायची याकरता महाविकास आघाडीने एक कोअर टीम तयार केली आहे. जी टीम आता राज्यातील पोलिसांच्या बदल्या करणार आहेत. यात शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. काँग्रेसच्या कारवाईवर सचिन पायलटांची सूचक प्रतिक्रिया, दिले नवे संकेत सध्या मुंबई पोलीस दलात सह पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त या पदांच्या बढत्या आणि बदल्या होणार आहेत. ज्याकरता अनेक वरीष्ठ पोलीस अधिकारी गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहे. तर दुसरीकडे या कोरोना संकट काळातही आपल्याच माणसाला क्रिम पोस्टिंग मिळावी याकरता नेते आणि मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त तसंच अनेक आयजी रँक अधिकारी यांच्याही बदल्या करण्यात येणार आहेत. असं म्हणतात की, जो मुंबई सह पोलीस आयुक्त असतो त्या अधिकाऱ्याची मुंबईवर 75 टक्के पकड असते. अगदी अंडरवर्ल्डपासून बाॅलिवूड आणि राजकीय पक्षांवर देखील सह पोलीस आयुक्तांचा वचक असतो. या पदासाठी नुकतीच बढती मिळालेले हायप्रोफाईल आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाची चर्चा जास्त आहे. पण मुंबई पोलीस गुन्हे शाखा, ATS चा दांडगा अनुभव असणारे निकेत कौशिक हे कधीही नांगरे पाटलांना वरचढ ठरू शकतात. मुंबई सह पोलीस आयुक्त गुन्हे पाठोपाठ मुंबई सर पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था या पदाला मुंबईत खूप वजन आहे. कारण, या करता यशस्वी यादव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मुंबई सह पोलीस आयुक्त प्रशासन आणि वाहतूक या पदावर कोणाची वर्णी लागणार हे ही महत्वाचे आहे. याकरता रविंद्र सिंघल, कैसर खालीद आणि कृष्ण प्रकाश यांच्या सारखी अनेक नावे चर्चेत आहेत. कोल्हापुरात भाजपविरुद्ध भाजप! पाणी देण्यावरून 4 तालुक्यातील शेतकरी आक्रमक फक्त सह पोलीस आयुक्त नाही तर अतिरिक्त पोलीस आयुक्त पदा करता ही लाॅबिंग सुरू झाले आहे. यात आपली कामगिरी दाखवण्यासाठी बिहारहून मुंबईला आलेले बिहारचे सिंघम शिवदिप लांडे यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे या पदाकरता जवळपास नियुक्ती झाल्याचे निश्चित आहे. तर मुंबई पोलीस दलात सर्वांत क्रिम पोस्टिंग म्हणजे मुंबई पश्चिम अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी संदीप कर्णिक यांच्या नावाची चर्चा आहे. मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई आणि पुर्व मुंबई इथल्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्या नुकत्याचं झाल्या आहेत. पण जर राजकीय मंडळी अडून बसले तर या पदांवर देखील नवीन नियुक्त्या होवू शकतात. कोरोनाचा कहर! CRPF आणि SRPFच्या 40 जवानांना लागण, रुग्णांनी ओलांडली शंभरी खरंतर पोलीस दलात बदल्या या सेवा ज्येष्ठतेनुसार आणि कार्यकालानुसार केल्या जातात. काही वर्षांपूर्वी तर अधिकाऱ्यांच्या कुवती नुसार बदल्या केल्या जायच्या पण गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेत्यांच्या पसंतीने पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पाठोपाठ पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनाही ‘मातोश्री’ची पायरी चढावी लागली. कारण, फक्त मुंबईत नाही तर राज्यभरातील सर्व वरीष्ठ पोलीस अधिकारी हे ‘मातोश्री’ आणि महाविकास आघाडीतील वरीष्ठ नेत्यांच्या मर्जीतील असतील, हे आता स्पष्ट झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.