जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Mangalsutra : लग्नात नववधूला उलटं मंगळसुत्र का घालतात? मुलीच ते का घालतात?

Mangalsutra : लग्नात नववधूला उलटं मंगळसुत्र का घालतात? मुलीच ते का घालतात?

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

तुम्हाला लग्नात असं उलटं मंगळसुत्र का घालतात या मागचं कारण माहितीय का? तसेच मगंळसुत्र लग्नात का घातलं जातं, त्याचं महत्व माहितीय का? चला याबद्दल जाणून घेऊ.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : हिंदू लग्नाच्या परंपरेनुसार लग्नाच्या दिवशी मुलीला मंगळसुत्र घातले जाते. आजकाल शहरांमध्ये अनेक मुली लग्न झाल्यानंतरही मंगळसूत्र घालत नाहीत. काहींना हे घालणं आवडत नाही, तर काहींची आणखी काही वेगळी कारणं असू शकतात. तुम्ही लग्नात पाहिलं असेल की बऱ्याचदा नवऱ्या मुलीला उलटं मंगळसुत्र घातलं जातं, जे काही दिवसांनी किंवा लग्नानंतरच्या पहिल्या सणाला सरळ केलं जातं. पण तुम्हाला लग्नात असं उलटं मंगळसुत्र का घालतात या मागचं कारण माहितीय का? तसेच मंगळसुत्र लग्नात का घातलं जातं, त्याचं महत्व माहितीय का? चला याबद्दल जाणून घेऊ. कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेज दोघांमध्ये फरक काय? मंगळसूत्राचे वैज्ञानिक महत्त्व वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास, मंगळसूत्रामुळे लग्न झालेली स्त्री नेहमी आनंदी राहाते. तसेच या मंगळसुत्रामधील वाट्या जेव्हा महिलेच्या हृदयाजवळ येतात तेव्हा ते तिच्यासाठी उत्तम ठरतात. यामागे कारण आहे ते त्या वाट्याचा धातू. सोन्याच्या धातूने बनलेल्या मंगळसुत्रामधील वाट्या या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे आणि याच कारणामुळे खरंतर नववधूचं मंगळसुत्र मोठं बनवलं जातं. मंगळसूत्र हे सोने आणि चांदीने बनविण्यात येते. दोन्ही धातू हे महिलांच्या हृदयाला निरोगी राखण्यास मदत करतात. या धातूमुळे रक्तदाबदेखील नियंत्रणात राहाते मंगळसूत्रातील काळा मोती हा महिलांना राहू, केतू, शनिच्या दुष्प्रभावापासून वाचवतो. पण आता काळानुसार महिला आपल्या आवडीप्रमाणे लहानमोठं मंगळसुत्र वापरतात. आता ते उलटं का घालतात हे जाणून घेऊ. मंगळसूत्राला संस्कृतमध्ये ‘मांगल्यतंतू’ असे म्हटले जाते. मंगळसूत्रामध्ये दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी 4 छोटे मणी 2 लहान वाट्या असतात. एक नवऱ्याच घर आणि दुसरी वाटी माहेर. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन. 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ. वराकडील एकाद्या सुवासिनीने वधू-वरांना पूर्व दिशेकडे तोंड करून बसायला सांगावे आणि वधूस अष्टपुत्री नावाची दोन वस्त्रे, कंचुकी (काचोळी, चोळी) आणि काळ्या मण्यांचे मंगळसूत्र द्यावे असे सांगण्यात येते. दोन्ही वाट्यांमध्ये हळद आणि कुंकू हे सौभ्यागाचे लक्षण भरून हे उलटे घातले जाते. ज्यामुळे लोकांना कळते की महिला नुकतीच सैभाग्यवती झाली आहे किंवा तिचं नुकतंच लग्न झालं आहे. महिलांसाठी मंगळसूत्र हे खूपच महत्त्वाचे असते. नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्येही मंगळसूत्र घालण्याची परंपरा आहे. भारताच्या संस्कृतीमधअये मंगळसूत्र म्हणजे विवाहित महिलांसाठी सौभाग्याचे रक्षा कवच मानण्यात येते. काळ्या मण्यांचे नक्की काय महत्त्व आहे? कोणत्याही नव्या गोष्टींना नजर लागते असं आपल्याकडे म्हटलं जातं. मंगळसूत्रात यासाठीच काळे मणी ओवलेले असतात. नव्या जोडप्याला अथवा संसाराला कधीही कोणाची नजर लागू नये आणि सुखाचा संसार व्हावा यासाठी काळे मणी असणारे मंगळसूत्र महिलांना घातले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

मग हीच गोष्ट नवऱ्याला का लागू होत नाही असाही प्रश्न खरं तर उद्भवतो. पण आपल्याकडे पुरूषसत्ताक पद्धत असल्याने मुली नवऱ्याच्या घरी जातात. त्यांना सर्वाधिक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. त्यामुळे तिची चिडचिड कमी व्हावी. मन, चित्त थाऱ्यावर राहावे यासाठी सोने या धातूचा उपयोग करून मंगळसूत्र घातले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात