मराठी बातम्या /बातम्या /Viral /

... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट

... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका गावातील लोकांचं असंच रातोतार नशीब बदललं. ज्यामुळे जवळ जवळ गावातील १६५ लोक एका रात्रीत श्रीमंत झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 09 डिसेंबर : आपण करोडपती व्हावे असे सगळ्यांनाच वाटत असते. पण कोणीही एका रात्रीच श्रीमंत होत नसतं. त्यासाठी खूप मेहनत आणि चिकाटीची गरज असते. त्यामुळे जर एखादा रातोरात श्रीमंत झाला तर एकतर त्याला लॉट्री लागलेला असते किंवा मग त्याने चोरी लबाडी करुन पैसे कमावलेले असावेत.

एका गावातील लोकांचं असंच रातोतार नशीब बदललं. ज्यामुळे जवळ जवळ गावातील १६५ लोक एका रात्रीत श्रीमंत झाले आहेत.

हे ही वाचा : Video : जेव्हा मगरीचं कॉस्ट्यूम घालून तो खऱ्या मगरीजवळ येतो, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

या लोकांनी एकत्रितपणे लॉटरीत 1200 कोटींहून अधिक रक्कम जिंकली. अशा प्रकारे प्रत्येकाच्या खात्यात सुमारे 7 कोटी 50 लाख रुपये आले. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर बेल्जियमच्या अँटवर्प प्रांतात असलेल्या या ओल्मेन गावात जल्लोषाचे वातावरण आहे.

रिपोर्टनुसार ओल्मेन गावातील 165 लोकांनी मिळून युरोमिलियन लॉटरीची तिकिटे खरेदी केली. त्यासाठी प्रत्येकाने १,३०८ रुपये दिले होते. मंगळवारी लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये त्यांच्या लॉट्रीच्या तिकीटाचा नंबर आला. ज्यामुळे आता त्यांना 123 दशलक्ष पौंड बक्षीस म्हणून मिळणार आहेत. भारतीय चलनात ही रक्कम १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

ही रक्कम 165 लोकांमध्ये वाटली तर प्रत्येकाच्या खात्यात सुमारे साडेसात कोटी रुपये येतील. लॉटरी काढण्यापूर्वीच बक्षिसाची रक्कम सर्वांमध्ये समान वाटली जाईल, असे गावकऱ्यांनी ठरवले होते. विजेत्यांनी या लॉट्रीला एक 'सर्वोत्कृष्ट ख्रिसमस गिफ्ट' म्हणून म्हटलं आहे.

नॅशनल लॉटरीचे प्रवक्ते जॉक वर्मोरे म्हणाले की, ग्रुपमध्ये अशा प्रकारे बक्षीस जिंकणे ही नवीन गोष्ट नाही. तथापि, 165 लोकांचा हा गट आतापर्यंतचा सर्वात मोठा लॉटरी विजेता आहे. त्यांनी पुढे सांगितले की आम्हाला त्यांनी लॉटरी जिंकली आहे हे 5 ते 6 वेळा सांगावा लागला कारण लोकांचा विश्वास बसत नव्हता की त्यांनी एवढी मोठी रक्कम जिंकली आहे.

सध्या तरी विजेत्यांची ओळख उघड झालेली नाही. विशेष म्हणजे, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा युरोमिलियन्स जॅकपॉट नाही. ब्रिटनमधील एका व्यक्तीने या वर्षी जुलैमध्ये 195 दशलक्ष पौंड (19000 कोटी) बक्षीस जिंकले होते.

First published:

Tags: Money, Shocking, Social media, Top trending, Viral, Viral news