जाहिरात
मराठी बातम्या / Viral / QR Code कसं काम करतं? ते कोणत्याही बाजूने स्कॅन कसं होतं?

QR Code कसं काम करतं? ते कोणत्याही बाजूने स्कॅन कसं होतं?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

बारकोड फक्त सरळच स्कॅन करावा लागतो, पण QR कोड हा कसा ही स्कॅन केला तरी देखील कसा काम करतो?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : आपण आता ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी QR Codeचा वापर करतो. तेव्हा पासून आपल्याला हे काय असतं हे माहिती पडलं आहे. पण तुम्हाला माहितीय का ही QR Code हा प्रकार फार पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. ज्याचा वापर करुन आपण माहिती मिळवू शकतो. हा बारकोड सारखाच एक प्रकार आहे. पण असं असलं तरी देखील बारकोड हा आपल्याला नेहमी सरळच स्कॅन करावा लागतो, पण QR Code चं तसं नाही. त्याला कसं ही स्कॅन केलं तरी देखील ते रिड केलं जातं? कधी विचार केलाय की हे कसं शक्य आहे? चला जाणून घेऊ.

News18लोकमत
News18लोकमत

QR Code कसं काम करतं? क्यूआर कोडचे पूर्ण नाव क्विक रिस्पॉन्स कोड आहे. 1994 मध्ये डेन्सो वेव्ह या जपानी बारकोड विकसकाने विकसित केलेला एक प्रकारचा बारकोड आहे. त्याच्या नावावरून एक माहिती मिळते की QR कोड खूप वेगाने काम करतो. QR कोड स्क्वेअर बॉक्समध्ये एक नमुना आहे, ज्यामध्ये URL आणि मोबाइल नंबर लपलेला असतो. हे एका पॅटर्नच्या स्वरूपात आहे जेणेकरुन त्यामध्ये कोणता नंबर किंवा वेब एड्रेस लपलेला आहे, हे बघून समजू शकत नाही. Wired Rituals : तरुणींच्या नग्न शरीरावर करतात जेवण, ‘या’ देशातील परंपरा थक्क करणारी QR कोड कुठे वापरला जातो? आज जगभरातील कंपन्या त्याचा वापर करत आहेत. वैयक्तिक वापराबद्दल बोलायचे झाल्यास, शॉपिंग किंवा कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये QR कोड स्कॅन करून पेमेंट सहज करता येते. यामुळे सुट्ट्या पैशाचे टेन्शन नाही आणि रोख रक्कम सोबत घेऊन जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्या फोनच्या मदतीने पेमेंट करणे सोपे होते. शिवाय तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची माहिती हवी असेल, तरी देखील तुम्ही कोड स्कॅन करुन त्या प्रोडक्टची माहिती मिळवू शकता. तुम्ही जर नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येऊल की QR कोड हा चौकोनी असतो आणि त्याच्या तीन टोकांनी लहान चौकोन असतात, जे गॅजेट, कंम्प्यूटर किंवा मोबाईल ऍप्लिकेशनला माहिती देतात की त्याला कोणत्या बाजूने स्कॅन करायचे आहे. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही बाजूने कोड स्कॅन केला तरी तो रिड केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात