मुंबई : प्रत्येक देशाच्या आपल्या वेगळ्या अशा परंपरा असतात. त्या परंपरा त्या देशातील लोकांसाठी नॉर्मल किंवा नित्याच्या असल्या तरी देखील त्या बऱ्याचदा इतर देशातील लोकांना ऐकायला किंवा पाहायला विचित्र वाटतात. अशीच एक परंपरा आहे ज्याबद्दल क्वचितच कोणी ऐकलं असेल.त ही एक आश्चर्यकारक परंपरा आहे, जो कोणी ऐकतो तो आश्चर्यचकित होतो.
जपानी रेस्टॉरंट्स आणि पार्ट्यांमध्ये मुलींच्या उघड्या अंगावर जेवण दिले जाते आणि पाहुणे ते मोठ्या आवडीने खातात. ही परंपरा लोकांच्या स्वागतासाठी केली जाते. याचा संदर्भ काही जपानीज सिनेमांमध्ये ही पाहायला मिळतो. या प्रथेमध्ये जेव्हा कोणी पार्टी आयोजित करतं तेव्हा टेबलवर प्लेट्स नसतात तर मुलीला झोपायला लागते, यावेळी त्या मुलीच्या अंगावर एकही कपडे नसतात. अशावेळी त्या महिलेवर काही पाने आणि वाट्या ठेवून जेवण दिले जाते. तसेच काही रेस्टॉरंटमध्येही असा प्रकार केले जातो. या बदल्यात मुलींना काही पैसेही दिले जातात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. इथे आपल्याच वडिलांशी लग्न करतात मुली, कुठे आहे अशी विचित्र परंपरा? जपानमध्ये ही परंपरा न्योतैमोरी परंपरा म्हणून ओळखली जाते. प्रथम मुलीला टेबलावर झोपवले जाते, नंतर तिच्या वर सुशी (एक प्रकारची डिश) दिली जाते जेणेकरून ती खाली घसरू नये, त्यानंतर पाहुण्यांना तिच्याभोवती बसवले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे या काळात मुलींच्या अंगावर एकही कपडा नसतो. पैसे कमावण्यासाठी इथल्या मुलींसाठीही हा एक प्रकारचा व्यवसाय आहे. तरी या मुली आपली ओळख लपवण्यासाठी मास्कने आपलं तोंड झाकतात. कधी कधी हे काम पुरुषही करतात. पुरुषांनी हे काम केले तर त्याला ‘नानताईमोरी’ म्हणतात.