मुंबई : पत्ते अनेक लोक खेळतात. तुम्ही देखील कधी ना कधी पत्ते खेळले असतीलच, अगदीच नाही तर कोणातरी पत्त्यांनी खेळताना तरी नक्की पाहिलं असेल. या पत्त्यांमध्ये राणी, राजा, गुलाम आणि एक्का असे मोठे पत्ते असतात. तर त्याच्या खाली 10,9,8 असे 2 पर्यं पत्ते असतात. ज्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे आणि चिन्हाचे एकून 52 पत्ते असताता, जे 4 भागात विभागले गेले आहे. चारही रंगांचे चार वेगवेगळे राजे आहेत. मात्र, यापैकी एका राजाला मिशी नाही. हे तुम्ही कधी पाहिलंय का? जर सगळ्या राजांना मिशी असते मग त्यापैकी एका राजाना मिशी का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल, तर चला यामागचं कारण जाणून घेऊ.
वानराने लावले माकडाच्या कानशिलात, पुढे जे घडलं ते… पाहा Video
वास्तविक, कार्ड्सच्या डेकमध्ये बदाम, किलावर, डायमंड आणि इस्पिक असे वेगवेगळ्या रंगाचे असतात आणि त्या सर्वांत 4 राजे असतात. पण आता त्यातील एका राजाला मिशी नसते. यामध्ये लाल पान किंवा बदाम राजाच्या चेहऱ्याला मिशी नसते. या मागचे कारण काही वेगळेच आहे. असे म्हटले जाते की जेव्हा ते डिझाइन केले जात होते तेव्हा डिझायनर ते प्रिंट करण्यास विसरला आणि तेव्हापासून ते ट्रेंडमध्ये आहे.
सोर्स : गुगल
सोर्स : गुगल
तर यामागे काही आणखी कारणं देखील दिली जातात. लोक असेही मानतात की चार राजे वेगवेगळ्या राजांनी प्रेरित आहेत. तर असेही म्हणतात की हे कार्डे फ्रेंच लोकांनी बनवली होती. लोकप्रिय ऐतिहासिक राजेशाही व्यक्तींना प्रत्येक रंगाचे राजे म्हणून निवडले गेले. पत्त्यांचे राजे चार प्रकारचे आहेत - डेव्हिड, चार्ल्स, ज्युलियस सीझर आणि ग्रेट अलेक्झांडर. हार्ट्स किंवा बदामचा राजा हा फ्रेंच राजा शार्लेमेन (चार्ल्स) आहे, ज्याला मिशा नव्हत्या कारण तो खूप देखणा आणि प्रसिद्ध होता. काहींचा अंदाज आहे की चार्ल्सच्या मृत्यूशी त्याचा काहीतरी संबंध आहे.
सर्वात विचित्र भाग म्हणजे चार्ल्सने स्वतःला मारण्याचा निर्णय घेतला तो दिवस 7/6/1462 होता. जर त्याची बेरीज केली गेली तर त्याचे उत्तर फक्त 13 (7+6=13) असेल आणि जर सर्व वेगळे जोडले गेले तर त्याचे उत्तर देखील 13 (1+4+6+2=13) असेल. मात्र, याला योगायोगही म्हणता येईल.