आनिस शेख, प्रतिनिधीपुणे, 02 ऑगस्ट : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उस्मानाबाद येथून मुंबईकडे वाहतूक करणाऱ्या 3 टेम्पोना शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर स्वामी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या कारवाईत तब्बल 65 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोमांसची वाहतूक करत असताना अतिशय चलाखीने टेम्पोमध्ये गोमास लपवून ठेवले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. गोमांसावर पूर्णपणे प्लास्टिक झाकून त्यावर भाजीपाला तसंच भाजीपाल्याचे मोकळे क्रेट ठेवण्यात आलेले होते.
प्रथमदर्शनी पाहिले असता कोणालाही वाटेल की संबंधित गोमांस वाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये भाजीपाल्याची वाहतूक होत आहे. परंतु, पूर्णपणे खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर तक्रारदाराने उर्से टोल नाका येथे पहाटे 4 वाजेच्या सुमारास पोलिसांच्या मदतीने टेम्पोला अडवण्यात आले.
त्यानंतर टेम्पोची पाहणी केली असता 50 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 30 टन गोमांस आढळून आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोमांस सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. लॉकडाउनच्या काळात इतक्या मोठा प्रमाणात गोमांस कुठे नेण्यात येत होते, याचा पोलीस शोध घेत आहे.
राम मंदिराच्या भूमिपूजनावरून जितेंद्र आव्हाडांची भाजपवर जळजळीत टीका, म्हणाले...
या कारवाईमध्ये गोमांस आणि पंधरा लाख किंमतीचे तीन टेम्पो असा एकूण 65 लाख 40 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी सात जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.