जाकार्ता, 30 जून: लैंगिक शिक्षण
(Sex Education) ही काळाची गरज आहे. किशोरवयीन मुलांना
(Teenage Sons) पालकांनी याबाबत शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे या वयातील मुलांना लैंगिकतेबाबत शास्त्रीय माहिती मिळते आणि या अनुषंगाने असणारे गैरसमज दूर होण्यास मदत होते. याबाबत सध्या इंडोनेशियातील
(Indonesia) एका महिलेची अशीच एक व्हायरल झालेली वादग्रस्त मुलाखत नेटिझन्सचा चर्चेचा विषय ठरत आहे.
टाईम्स नाऊ न्यूज डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील एक आई आपल्या किशोरवयीन मुलांना लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी त्याच्यासोबत पॉर्नोग्राफिक व्हिडीओ
(Pornographic Video) पाहत असल्याचे व्हायरल झाले आहे. इंडोनेशियातील प्रख्यात पॉप स्टार
(Pop Star) वाह्यू सेटॅनिंग बुडी ही युनी शारा या नावाने देखील ओळखल्या जातात. पॉर्नचा मुलांवर होणारा परिणाम या वादग्रस्त विषयावर 49 वर्षीय युनी शारा यांनी युटयुबर व्हेना मेलिंडाला दिलेल्या मुलाखती दरम्यान खुलासा केला आहे. यावेळी शारा म्हणाल्या की आजच्या पिढीतील मुलांसाठी पॉर्न न पाहणे ही अशक्य बाब आहे. मात्र पालकांनी मुलांना अॅडल्ट कंटेट
(Adult Content) पाहताना पकडले तर हे चांगले नाही, असे मुलांना सांगू नये. माझी मुलं ही खुल्या विचारांची आहेत. मात्र आजकाल ज्या प्रकारचा कंटेट असो किंवा अॅनामे
(Anime) असो आमच्या मुलांसाठी अश्लील गोष्टी पाहणे अशक्य आहे, असे शारा यांनी सांगितले.
हेही वाचा- पायलट एवढा पगार घेतो अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड; किंमत ऐकून व्हाल धक्क
सीएनएन इंडोनेशियाने दिलेल्या वृत्तानुसार, शारा पुढे म्हणाल्या की मी माझ्या मुलांना निःसंकोच पॉर्न
(Porn) पाहण्याची मुभा दिली आहे. तसेच लैंगिक शिक्षणासाठी मी देखील त्यांच्यासोबत पॉर्न पाहते. तथापि, हा कदाचित फार दूरदृष्टीने केलेला विचार असू शकतो असे शारा कबूल करतात. असा कंटेट एकत्र पाहाताना तुमची मुलं काय विचार करतात, ते छान आहे म्हणतात? त्यावर उत्तर देताना शारा म्हणतात, कोणत्याही आईला हे पटण्यासारखं नाही.
हेही वाचा- मोठी बातमी: ब्राझील सरकारचा धक्कादायक निर्णय, भारताला मोठा झटका
शारा यांच्या युनिक
(Unique) पालकत्वाच्या शैलीने वादाला तोंड फुटले आहे. यामुळे बऱ्याच नेटिझन्सचे धाबे दणाणले आहे. परंतु, इंडोनेशियातील एका संस्थेतील प्रसिध्द मुले आणि किशोरवयीन मुलांचे शिक्षणतज्ज्ञ अगस्ट्रीड पायथर यांनी या प्रकाराचे कौतुक केले आहे. त्या म्हणतात, की हे योग्यच आहे. जेव्हा आपण मुलांना पॉर्नोग्राफिक चित्रपट बघताना पाहतो, त्यावेळी ते अस्वस्थ होतात. अशावेळी आपण जर मुलांना रागवलो तर ते पुन्हा असा कन्टेंट गुपचूप बघतील, असे पायथर यांनी सांगितले.
या चर्चेत, पालकांनी आपल्या मुलांना वस्तुस्थिती आणि विज्ञानावर आधारित लैंगिक शिक्षण द्यावे. हे शिक्षण पॉर्नोग्राफीक चित्रपटांवर आधारित नसावे, असे पायथर यांनी सांगितले. तथापि पायशर म्हणाले, की एक्स रेटेड व्हिडिओ पाहिले म्हणून तुम्ही जर तुमच्या मुलांना रागावलात तर असे व्हिडिओ त्यांच्यासोबत बसून पाहण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.