नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : सोशल मीडियामुळे अगदी छोटीशी गोष्टही काही मिनिटांत लाखो-करोडो लोकांपर्यंत जाऊन पोहोचू शकते. त्यात सेलेब्रिटींशी (Celebrity) संबंधित काही गोष्टी असतील तर बघायलाच नको. अशा गोष्टी व्हायरल (Viral) होतातच. सेलेब्रिटींचे फॅन्स सोशल मीडियावर सेलेब्रिटींसारखा चेहरा असणाऱ्या व्यक्तींनाही शोधत असतात. सध्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू, वेगवाग गोलंदाज शोएब अख्तरसारखा (Shoaib Akhtar) चेहरा असणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही व्यक्ती पुरुष नाही, तर महिला आहे. अगदी शोएबसारखी दिसणारी ही महिला भारतात आहे. शोएबसारख्या दिसणाऱ्या या भारतीय महिलेची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे. या महिलेचं नाव आहे वनिता खिलनानी (Vanita Khilnani). वनिता ही टिकटॉक (TikTok) युझर असून आपल्या टिकटॉक अकाउंटवरून ती मजेदार फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचा चेहरा शोएब अख्तरशी बराच मिळताजुळता आहे. त्यामुळे सोशल मीडिया युझर्सनी तिच्या आणि शोएब अख्तरच्या फोटोचं कोलाज करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.
युझर्सनी केलेले कोलाज, तसंच व्हिडिओ वनिता खिलनानीनंही तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून शेअर केले आहेत. अलिकडेच वनिताने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. आपले पालक कशा प्रकारे फोटो काढायचे याबद्दल तो व्हिडिओ होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
शोएब अख्तरसारखी दिसत असलेल्या वनिताचा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. हे वाचा - ‘आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी’, रॅलीवर नोटांची तुफान उधळण, VIDEO शोएब अख्तर 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्याच्या वेगवान गोलंदाजीची जितकी चर्चा असायची, तितकीच मैदानावरच्या त्याच्या वागणुकीचीही. केवळ पाकिस्तानातच नव्हे, तर जगभर त्याचे चाहते आहेत. निवृत्तीनंतरही तो कालबाह्य झालेला नाही. चाहत्यांच्या कायम नजरेत राहण्यासाठी आता तो एक यू-ट्यूब चॅनेल (YouTube Channel) चालवतो आणि त्यावर नियमितपणे व्हिडिओ पोस्ट करतो. त्यात तो क्रिकेटमधल्या ताज्या घडामोडींबद्दल बोलतो. वादग्रस्त विषयांवरही तो बोलतो. आपल्यासारखी दिसणारी एक महिला भारतात आहे, हे कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल याचा मात्र अद्याप अंदाज आलेला नाही.