मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी', रॅलीवर नोटांची तुफान उधळण, VIDEO

'आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी', रॅलीवर नोटांची तुफान उधळण, VIDEO

 या पठ्याने जमलेल्या लोकांवर 500 रुपयांच्या नोटा उधळल्या आहे. त्यामुळे नोटा गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची एकच झुंबड उडाली होती.

पुणे, 25 फेब्रुवारी : राज्यात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली आहे. सरपंच निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून ठिकठिकाणी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला जात आहे. पण पुण्यातील खेड तालुक्यात नवनिर्वचित सरपंचाच्या रॅलीत चक्क नोटांची उधळण झाल्याचे पाहण्यास मिळाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडी गावात सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे. सरपंच निवडी नंतर अक्षरश: लोकशाहीचा बाजार मांडल्याची परिस्थिती गावात पाहायला मिळाली असून विजयी पार्टीच्या एका तरुणाने गावातील चावडीवर चक्क पैशांची उधळण केली आहे.

डीजे लावण्यात आलेल्या स्पीकरजवळ उभं राहून या पठ्याने नोटांचे बंडल  रिकामे केले. या पठ्याने जमलेल्या लोकांवर 500 रुपयांच्या नोटा उधळल्या आहे. त्यामुळे नोटा गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची एकच झुंबड उडाली होती. धक्कादायक म्हणजे, राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा ओढावले आहे, अशा परिस्थितीत मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिगचे अंतर पाळण्यासाठी आवाहन केले जात आहे. पण, या रॅली सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले आहे.

पैसा हा लक्ष्मी मानला जातो परंतु याच पैशाची अशी उधळपट्टी केल्याने तालुक्यात एकच चर्चेचा विषय बनला आहे.

First published:
top videos