मराठी बातम्या /बातम्या /Viral /दुबईत ड्रायव्हिंग करणाऱ्या भारतीयाला लागला कोट्यवधींचा जॅकपॉट, गावासाठी करणार खर्च

दुबईत ड्रायव्हिंग करणाऱ्या भारतीयाला लागला कोट्यवधींचा जॅकपॉट, गावासाठी करणार खर्च

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

जॅकपॉट जिंकल्यानंतर दुबईत ड्रायव्हिंगचं काम करणाऱ्या भारतीयाला विश्वासच बसला नाही. त्याने एका ड्रॉचे तिकिट खरेदी केले होते त्यात कोट्यवधींचा जॅकपॉट लागला.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 24 डिसेंबर : कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी प्रत्येक जण छोटा-मोठा व्यवसाय, नोकरी किंवा काम करून पैसे कमावत असतो. परंतु, एखाद्याचं नशीब एका रात्रीत पालटतं. दुबईमध्ये राहणाऱ्या मूळ भारतीय व्यक्तीच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे. दुबईत ड्रायव्हर म्हणून नोकरी करणाऱ्या मूळच्या दक्षिण भारतातल्या अजय ओगुला नावाच्या व्यक्तीला ‘अमिरात ड्रॉ’मध्ये 15 मिलियन डरहॅम म्हणजेच 33 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला आहे. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

  अजय यांनी ‘अमिरात ड्रॉ’चं एक तिकीट काही दिवसांपूर्वी घेतलं होतं. मॅजिक नंबरशी त्या तिकिटावरचा नंबर मॅच झाल्यानं त्यांना पुरस्काराची रक्कम प्राप्त झाली. लॉटरी जिंकल्यानंतर अजय यांचा यावर विश्वास बसत नव्हता. परंतु खात्यात रक्कम जमा झाली तेव्हा त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मीडिया रिपोर्टनुसार, अजय हे दक्षिण भारतातल्या एका गावातले आहेत. चार वर्षांपूर्वी ते युनायटेड अरब अमिरात (यूएई) इथे कामासाठी गेले. तिथं एका ज्वेलरी फर्ममध्ये ते ड्रायव्हर म्हणून नोकरी करत आहेत. या मोबदल्यात त्यांना दर महिन्याला 3,200 डरहॅम वेतन मिळतं.

  हेही वाचा : खात्यात अचानक 470 रुपये, महिलेनं बँकेत तक्रार करताच... नक्की काय घडलं?

  अजय यांना समाजकार्याची आवड आहे. त्यामुळे ट्रस्टच्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांना ते नेहमी मदत करतात. जॅकपॉट जिंकल्यानंतरही समाजकार्य सुरूच ठेवणार असून, चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून मदत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जॅकपॉटमध्ये मिळालेल्या रकमेतून भारतातलं आपलं मूळ गाव आणि शेजारच्या गावांमध्ये मूलभूत सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

  याआधीही आजमावलं होतं नशीब

  जॅकपॉट जिंकल्यानंतर अजय म्हणाले, 'माझ्या एका मित्राने ‘अमिरात ड्रॉ’मध्ये 7,777 डरहॅम जिंकले होते. त्याच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर यावर माझा विश्वास बसला. त्यामुळे आपणही या ड्रॉमध्ये नशीब आजमावयाला हवं असं मला वाटत होतं. हा जॅकपॉट लागण्याआधी मी काही वेळा लॉटरीच्या तिकिटांची खरेदी केली होती. तेव्हा जॅकपॉटमध्ये नाव आलं नाही. पण आज हा जॅकपॉट लागल्यानं मला आनंद होत आहे.'

  हेही वाचा : Video : आधी विजेच्या तारेवर चढला आणि... प्रेयसीसाठी तरुणाचं धक्कादायक पाऊल

   कोट्यधीश झाल्यानंतरही कुटुंबाला बसत नाही विश्वास

  जॅकपॉट जिंकल्यानंतर अजय यांनी कुटुंबाला याची माहिती दिली. परंतु त्यांचा यावर विश्वास बसत नव्हता. कोट्यधीश झाल्याचं सांगितल्यानंतरही आई, भाऊ-बहीण यांना आपण चेष्टा करत आहोत की काय, असं वाटलं; पण नंतर त्यांना याबद्दल खात्री पटली. ड्रॉमध्ये 50 वर्षीय ब्रिटिश नागरिक पाऊला लिच यांनी 7,777 डरहॅमची लॉटरी जिंकली. भारतीय रुपयांत याची किंमत 17.91 लाख रुपये होते. मीडिया रिपोर्टनुसार, तीन अपत्यांची आई असलेली ही महिला गेल्या 14 वर्षांपासून यूएईमध्ये राहते व मनुष्यबळ विकास क्षेत्रात काम करते.

  First published:
  top videos

   Tags: Dubai, Money, UAE