बिजींग, 23 सप्टेंबर : भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद अजूनही संपला नाही आहे. मात्र सीमेवर भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. असे सांगितले जात आहे की, लडाख सीमेवर तैनात करण्यात आलेले जवान चक्क रडू लागले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये चिनी सैनिक रडताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ चिनी सैनिकांची भारतीय सीमेवर पोस्टिंग झाल्यानंतर तेथे जातानाचा आहे.
तैवान न्यूजनं (Taiwan News) आपल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, चिनी सोशल मीडिया वीचॅटवर (WeChat) हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो हटवण्यात आला. हा व्हिडीओ फूयांग रेल्वे स्टेशनवर जाता शूट करण्यात आल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सैन्यात भर्ती झालेले हे जवान ट्रेनिंगनंतर लडाख सीमेवर पोस्टिंगसाठी रवाना झाले आहेत.
वाचा-रचला इतिहास! या महिलेला मिळाला राफेलचा पहिल्या फायटर पायटल होण्याचा मान
上车后被告知上前线
炮灰们哭的稀里哗啦!pic.twitter.com/wHLMqFeKIa
— 自由的鐘聲🗽 (@waynescene) September 20, 2020
वाचा-भारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा
सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक
या व्हायरल व्हिडीओमध्ये चिनी सैनिक त्याचे सैन्या PLAचे (People's Liberation Army) गाणं ‘ग्रीन फ्लॉवर्स इन द आर्मी’ गात असल्याचे दिसत आहे. तैवान न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ सर्वप्रथम फूयांग सिटी विकलीच्या (Fuyang City Weekly) वीचॅटवर शेअर करण्यात आला. मात्र लगेचच हा व्हिडीओ हटवण्यात आला.
वाचा-'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही
भारताने 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा
भारतीय लष्कराने LAC जवळच्या उंचावरच्या 6 नव्या टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. लडाखच्या पूर्व भागातल्या या टेकड्या असून उंचावर असल्याने चिनी लष्करावर अंकूश ठेवणं सोपं जाणार आहे. या टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या. हा डाव ओळखताच भारतीय सैन्याने तातडीने पावलं टाकत या टेकड्या ताब्यात घेतल्या आहेत. 29 ऑगस्ट पासून या कारवाईला सुरूवात झाली होती. 15 सप्टेंबरपर्यंत या टेकड्या ताब्यात घेतल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.