नवी दिल्ली 20 सप्टेंबर: भारत आणि चीनमध्ये राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी सीमेवरचा तणाव कमी झालेला नाही. शांतता राखण्याचं ठरल्यानंतरही चिनी सैन्याच्या हालचाली सुरूच आहे. त्यामुळे भारतीय लष्कर सावध असून त्यांनी चिनी लष्कराला मोठा दणका दिला. भारतीय लष्कराने LAC जवळच्या उंचावरच्या 6 नव्या टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. लडाखच्या पूर्व भागातल्या या टेकड्या असून उंचावर असल्याने चिनी लष्करावर अंकूश ठेवणं सोपं जाणार आहे.
या टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या. हा डाव ओळखताच भारतीय सैन्याने तातडीने पावलं टाकत या टेकड्या ताब्यात घेतल्या आहेत. 29 ऑगस्ट पासून या कारवाईला सुरूवात झाली होती. 15 सप्टेंबरपर्यंत या टेकड्या ताब्यात घेतल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मगर हील, गुरूंग हील, रिसेहेन ला, रेझांग ला, मोखापरी आणि फिंगर-4 जवळची आणखी एक टेकडी अशा सहा ठिकाणी आता भारतीय जवानांचं वर्चस्व आहे. युद्धाचा प्रसंग आलाच तर भारतीय सैन्याला उंचावरून मारा करणे सोपे जाऊ शकते असा अंदाज संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
चीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला
काही दिवसांपूर्वीच चीनच्या टेहाळणी नौका भारतीय युद्ध नौकांवर लक्ष ठेवत असल्याची घटना उघडकीस आली होती. चीनच्या Yuan Wang या टेहाळणी नौकेने मलाक्काच्या समुद्रधुनी परीसरात प्रवेश केला होता आणि तिथून ते भारतीय नौकांची टेहाळणी करत होते अशी माहिती समोर आली आहे.
Indian Army has occupied six new major heights on LAC with China
— ANI Digital (@ani_digital) September 20, 2020
Read @ANI Story | https://t.co/yzuVmAS5Tm pic.twitter.com/cW5tsNf9PT
त्या भागात तैनात असलेल्या भारतीय युद्ध नौकांवर ते सतत लक्ष ठेऊन होते. भारतीय नौदलाच्या ही बाब लक्षात येताच चीनच्या नौकेने काढता पाय घेतला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने चीन भारतीयांवर नजर ठेवत असल्याचं पुढे आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता ही माहिती पुढे आल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढणार आहे.
भारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन
इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर हे तिन्ही देश मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरात आहेत. ही सामुद्रधुनी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ही घटना गंभीर समजली जाते. भारतीय नौदलाच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हालचाली करत सूचक इशारा दिला.