नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : सध्या लडाखमध्ये भारत आणि चीन सीमेवर मोठ्या प्रमाणात तणाव सुरू आहे. भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर ठाकले असून कोणत्याही क्षणी तणाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. मात्र याचदरम्यान एक भारतीय सैन्यासाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. हैद्रबादमधील मिधानी या कंपनीने बुलेट प्रूफ वाहनांबरोबरच एका अनोख्या बुलेट प्रूफ जॅकेटची निर्मिती केली आहे. या जॅकेटचे वैशिष्ट्य म्हणजे या जॅकेटला कोणतीही गोळी भेदू शकणार नाही.याविषयी कंपनीने माहिती देताना सांगितले कि, कंपनी जगभरात तयार होणाऱ्या आधुनिक हत्यारांवर नजर ठेवून आहे. त्यानुसार यामध्ये बदल करण्यासाठी देखील कंपनी तत्पर आहे. हे जॅकेट्स मोठ्या प्रमाणात सप्लाय करण्याची देखील कंपनीची क्षमता असून आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. कसे आहे बुलेट प्रूफ 'भाभा कवच'? हे जॅकेट भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच BARC च्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामुळे याचे नाव 'भाभा कवच' असे ठेवण्यात आले आहे. हे बुलेट प्रूफ जॅकेटमधून एके47 ची गोळीदेखील याला भेदू शकणार नाही. अशा प्रकारची हजारो जॅकेट्स याआधी भारताच्या सैनिकांना पाठवण्यात आली आहेत. या कवचचे वैशिष्ट्य BARC ने दिलेल्या माहितीनुसार या जॅकेटचे वजन खूपच कमी असून ते केवळ 6.8 किलो इतके आहे. गुजरातमधील फॉरेंसिक सायन्स यूनिवर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत हे जॅकेटला हिरवा कंदील मिळाला असून सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप उत्तम आहे. संपूर्ण पद्धतीने विदेशी बनावटीचे हे जॅकेट बोरोन कार्बाइड आणि कार्बन नैनोट्यूब वापरून बनवण्यात आले आहेत. यामध्ये चार सुरक्षा प्लेट्स वापरण्यात आल्या असून यामधील कार्बन कोटिंग अधिक उत्तम सुरक्षा प्रदान करते.संरक्षण विभागात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने भारताचे हे खूप मोठे पाऊल आहे. डोक्याच्या सुरक्षेसाठी बुलेट प्रूफ हेल्मेट, बुलेट प्रूफ जॅकेटबरोबरच कस्टमाइज़्ड आर्मर सिस्टम देखील विकसित केली जात आहे. केवळ कवचच नाही तर इतर देखील साधने केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्य केलेल्या मानकांनुसार या जॅकेटची निर्मिती करण्यात आली असून BIS level-6 चे आहेत. मिधानी कंपनीने म्हटले आहे कि,भारतात केवळ बुलेट प्रूफ जॅकेटच नाही तर सैन्यासाठी देखील इतर साधने भारतात तयार करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. हे ही वाचा-'हद्दीत राहा नाहीतर...', लढाऊ विमानं घुसताच शेजारी देशाने चीनला दिली धमकी कसे आहेत बुलेट प्रूफ वाहन? भारतीय सैनिकांना मोठ्या प्रमाणात बुलेट प्रूफ वाहनांची गरज असते. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार,मिधानी कंपनीने बनवलेली वाहने अतिशय अत्याधुनिक असून गाडीच्या टायरला गोळी लागली तरीदेखील ती 100 किलोमीटर चालू शकते. यालाच रनफ्लॅट टायर असे देखील म्हटले जाते. देशातील हे पहिले Isuzu बेस्ड युद्ध वाहन असून कोणत्याही परिस्थितीत ही वाहने कार्य करू शकतात. त्यामुळे देशासाठी गरज असणारी ही वाहने ज्या प्रकारे मिधानी तयार करत आहेत त्यामुळे लवकरच भारत सरकार आणि केंद्रीय सरंक्षण मंत्रालय त्यांच्याकडून ही वाहने खरेदी करू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.