मुंबई, 22 जानेवारी: ऑस्ट्रेलियातील (Australia) मोहीम फत्ते करुन टीम इंडिया (Team India) मायदेशी परतली आहे. भारताचा हा दौरा जेवढा क्रिकेटच्या मैदानात गाजला तितकाच तो मैदानाच्या बाहेर देखील गाजला. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संपूर्ण जग बदललं. क्रिकेटवरही अनेक निर्बंध आले आहेत.
‘बायो बबल’ (Bio-Bubble) हा आता क्रिकेटपटूंच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. भारतीय खेळाडू तर जवळपास पाच महिने यामध्ये होते. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर लगेच भारतीय टीम ऑस्ट्रेलियात रवाना झाली. ऑस्ट्रेलियातील कडक नियमांचं पालन त्यांना करावं लागलं. रोहित शर्मासह (Rohit Sharma) काही खेळाडू न्यू इयरच्या निमित्तानं हॉटेलमध्ये जेवल्यानं वाद निर्माण झाला होता.
शास्त्रींनी दिला होता इशारा
भारतीय टीम मायदेशी परतल्यानंतर या दौऱ्यातील नवे किस्से समोर येत आहेत. टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर (R. Sridhar) यांनी एक नवी माहिती नुकतीच सांगितली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंच्या कुटुंबीयाना परवानगी सुरुवातीला देण्यात आली नव्हती. याबाबत टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या इशाऱ्यानंतर ऑस्ट्रेलियन सरकार नरमलं आणि त्यांनी परवानी दिली, असं श्रीधर यांनी सांगितलं आहे.
नेमकं काय झालं?
भारतीय खेळाडू युएईमध्ये असतना हा सर्व प्रकार घडला असं श्रीधर यांनी भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विनला (R. Ashwin) दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
(हे वाचा-Sayed Mushtaq Ali Trophy: स्पर्धा सोडून जाणारा ‘हा’ खेळाडू निलंबित!)
'आपण सर्व दुबईमध्ये क्वारंटाईन होतो त्यावेळी त्यांनी अचानक खेळाडूंच्या कुटुंबीयांना परवानगी नाकारली. भारताचा दौरा सुरु होण्यापूर्वीच स्लेजिंग सुरु झालं होतं. आम्ही अनेकदा कॉलवर चर्चा केली. पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. सात भारतीय खेळाडूंचे परिवार आमच्या सोबत होते. त्या सर्वांना आम्ही हे कसं सांगणार? हा प्रश्न आम्हाला पडला होता. त्यावेळी एका कॉलच्या दरम्यान शास्त्रींनी इशारा दिला,’’ असं श्रीधर यांनी सांगितलं.
शास्त्रींचा रुद्रावतार!
चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही तोडगा निघाला नव्हता. त्यावेळी शास्त्रींनी निर्वाणीचा इशारा दिला, असं श्रीधर यांनी म्हंटलं आहे. 'माझ्या खेळाडूंच्या कुटुंबीयांना परवानगी देत नसाल तर आम्ही दौऱ्यावर नाही. तुम्हाला काय हवं ते करा. आम्ही पाहतो.' असा निर्वाणीचा इशारा शास्त्रींनी दिला होता, अशी माहिती श्रीधर यांनी दिली आहे.
...
आणि ऑस्ट्रेलिया सरकार नरमले!
रवी शास्त्रींनी या इशाऱ्यानंतर आपल्याला आणखी एक गोष्ट सांगितली, अशी आठवण श्रीधर यांनी सांगितली आहे. शास्त्री म्हणाले की, 'माझ्यापेक्षा जास्त ऑस्ट्रेलियन्स कुणालाही माहिती नाही. मी गेल्या 40 वर्षांपासून तिथं जात आहे. त्यांच्याशी कसं बोलायचं, कशा वाटाघाटी करायच्या याची मला माहिती आहे.'
(हे वाचा-...म्हणून मुलाचं 'अजिंक्य' ठेवलं, रहाणेच्या बाबांनी सांगितलं कारण)
रवी शास्त्रींचा हा विश्वास अनाठायी नव्हता. त्यांच्या इशाऱ्यानंतर ऑस्ट्रेलियन सरकार नरमलं. त्यांनी युद्धपातळीवर काम करुन भारतीय खेळाडूंच्या कुटुंबीयांना ऑस्ट्रेलियात येण्याची परवानगी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.