जाहिरात
मराठी बातम्या / Viral / प्रवाशाचा स्वत:वर राहिला नाही ताबा, विमानात केलं धक्कादायक कृत्य

प्रवाशाचा स्वत:वर राहिला नाही ताबा, विमानात केलं धक्कादायक कृत्य

विमान

विमान

जगभरातून अनेक लोक विमानाने प्रवास करतात. विमानामध्ये प्रवास करताना अनेक विचित्र प्रकरणे समोर येत असतात. कधी सामान गहाळ होतं तर कधी प्रवाशांमध्ये भांडणं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली,23 एप्रिल : जगभरातून अनेक लोक विमानाने प्रवास करतात. विमानामध्ये प्रवास करताना अनेक विचित्र प्रकरणे समोर येत असतात. कधी सामान गहाळ होतं तर कधी प्रवाशांमध्ये भांडणं. प्रवाशांच्या गैरप्रकाराच्या घटनांमध्ये तर दिवसेंदिवस अधिक वाढ होत चालली आहे. अशातच आणखी एक विमानातील विचित्र प्रकार समोर आलाय. अलास्का एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने गोंधळ घातला. त्या प्रवाशाने एका पुरुष फ्लाइट अटेंडंटला मागून पकडले आणि त्याच्या मानेवर जबरदस्तीने किस केले. यानंतर एकच गोंधळ उडाला.

News18लोकमत
News18लोकमत

आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रवाशाचे नाव डेव्हिड एलन वर्क असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे वय 61 वर्षे आहे. तो फर्स्ट क्लासचे तिकीट घेऊन मिनेसोटाहून अलास्काला जात होता. काही रिपोर्ट्समध्ये असा उल्लेख आहे की हा प्रवासी खूप मद्यधुंद होता, फ्लाइट अटेंडंटने या प्रवाशाला रेड वाईन दिली होती. रेड वाईन सर्व्ह करून तो निघून जात असताना प्रवाशाने मागून त्याचा हात धरला आणि जबरदस्ती किस करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर मागून तिच्या मानेचे चुंबनही घेतले. हेही वाचा -  पोलीसांपासून वाचण्यासाठी ड्रायव्हरने केला खतरनाक स्टंट, Video थक्क करणारा पुढे, तो काही क्षणांनंतर टॉयलेटच्या दिशेने जात होता, मग तिथेही त्याने फ्लाइट अटेंडंटला पकडून सांगितले की, तू खूप सुंदर आहेस. या घटनेनंतर दुसर्‍या फ्लाइट अटेंडंटने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर फ्लाइट अटेंडंटने संपूर्ण घटना कॉकपिटमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना सांगितली आणि त्यानंतर फ्लाइट लँड होताच या प्रवाशाला अटक करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात